🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क
अकोले : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत आज दिनांक १३ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत गणोरे सार्वजनिक ध्वजारोहण गणोरे ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी एकनाथराव ढाकणे यांच्या हस्ते सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ या सर्वांच्या सहमतीने एकमताने ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य,विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत गणोरे गावी आज सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय विविध संस्था, सोसायटी, बँका ,पतसंस्था यांनी आपल्या कार्यालयावर ध्वज फडकावून मानवंदना दिली व सेल्फी काढून सोशल मीडियावर आणि वेबसाईट पोर्टलवर अपलोड केले. तसेच गावामध्ये ग्रामपंचायतच्या जनजागृती अंतर्गत ध्वज विक्री व पूर्वीचे ध्वज वापरून सर्व ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या घरावर तिरंगा ध्वजाची उभारणी केली आहे. सलग तीन दिवस हर घर तिरंगा मोहीम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत पुढाकार घेत आहे. आजच्या ध्वजारोहणाचे मानकरी ग्रामविकास अधिकारी श्री ढाकणे हे अतिशय कर्तव्य भावनेने गणोरे गाव मॉडेल विकसित व्हावं गावातील रोजगाराच्या संधीत वाढ व्हावी शैक्षणिक दर्जा उत्तम राहावा. आरोग्य पिण्याचे पाणी चांगल्या प्रकारची दर्जात्मक सुविधा गावाला मिळावी प्रत्येकाला स्वच्छतेचे महत्व समजून सांगून स्वच्छता ही आरोग्याची मुख्य गुरुकिल्ली आहे.हे महत्व पटवून दिल्यामुळे सर्व ग्रामस्थ लोकसभाग घेऊन स्वच्छता मोहीम यशस्वी राबवत आहेत.
गणोरे ग्रामपंचायतीने ग्रामविकास अधिकारी यांच्या कालखंडात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान,माझी वसुंधरा अभियान,स्मार्ट ग्राम,स्वच्छ भारत मिशन अभियान,हागणदारीमुक्त अभियान हे अतिशय यशस्वी राबविले. त्याबद्द्ल राज्य पातळीवर विविध पुरस्काराने ग्रामपंचायत सन्मानित झालेली आहे. तसेच आजी-माजी पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली , सहकार्याने गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत वेगवेगले नावीन्यपूर्ण उपक्रम राबवते.त्यामुळे जिल्ह्यात अकोले तालुक्यात प्रथम क्रमांकाने ग्रामपंचायतचा काम करीत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
आज सुद्धा देश पातळीवर गणोरे गाव स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्यांमधून पुढे आहे. घनकचरा सांडपाणी व्यवस्थापनाचे काम कचरा मुक्ती प्लास्टिक बंदी घंटागाडी द्वारे सुका कचरा ओला कचरा वर्गीकरण करून त्याचा खत डेपो वैयक्तिक शौचालयाचा वापर सार्वजनिक शौचालयाचा वापर अतिशय नियोजनबद्ध काम गणोर ग्रामपंचायतीचे सुरू आहे.या कामी पंचायत समिती अकोले वेळोवेळी मार्गदर्शन करत आहे ग्रामविकास अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण केल्याबद्दल त्यांनी गावचे ग्रामपंचायतचे मनःपूर्वक आभार व्यक्त करून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कालखंडात कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
0 टिप्पण्या