Ticker

6/Breaking/ticker-posts

अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संकल्प करून योगदान देवू : दामोदर बठेजा

 
भारतीय सिंधू सभा व सिंध हिंद मंडळाच्या वतीने भारतमाता पूजन करून अखंड भारत दिन साजरा करण्यात आला. यावेळी दामोदर बठेजा, किशन पंजवानी, रमेश कुकरेजा आदींसह सिंधी बांधव उपस्थित होते.


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर – देशाची झालेल्या फाळणीत सर्वात जास्त सिंधी समाज होरपळला गेला. १४ ऑगस्टला देशाच्या फाळणीच्या काळात हिंदुंवर झालेल्या अत्याचाराचे व हिंसाचाराचे केवळ स्मरण करणे एव्हढेच न करता आमच्या सांस्कृतिक गमावलेल्या तो वारसा परत मिळवण्याचा दृढ संकल्पाचा दिवस आहे. अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रखर राष्ट्र भावनेचा जागर करून कटिबद्ध होवू. भारतीय सिंधू ससभेच्या वतीने देशाच्या झालेल्या फाळणीच्या काळात बलिदान गेलेल्या लाखो हिंदू बंधू भगिनींचे स्मरण करून हा देश पुन्हा अखंडित व्हावा यासाठी संकल्प करून योगदान देवू, असे प्रतिपादन भारतीय सिंधू सभेचे जिल्हाध्यक्ष दामोदर बठेजा यांनी केले.


            स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तारकपूर येथील भारतीय सिंधू सभा व सिंध हिंद मंडळाच्या वतीने भारतमाता पूजन करून अखंड भारत दिन साजरा करण्यात आला. तसेच चालिहो उत्सवा निमित्त बेहेराना साहेब महाराजांचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानिमित्ताने तारकपूर येथे संत कंवरराम चौकात आयोजित कार्यक्रमात भारतीय सिंधू सभेचे जिल्हाध्यक्ष दामोदर बठेजा बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने सिंधी समाजाचे नागरिक, महिला, युवक उपस्थित होते. यावेळी भारतमातेच्या जयजयकाराच्या  व जय झुलेलाल... जय झुलेलालच्या घोषणा देण्यात आल्या.


            कार्यक्रमाचे प्रास्ताविकात रमेश कुकरेजा यांनी भारतीय संधू सभेच्या उपक्रमाची माहिती दिली. हिंद सिंध मंडळाचे अध्यक्ष किशन पंजवानी यांनी आभार मानले. यावेळी सिंधी जनरल पंचायतचे अध्यक्ष महेश मध्यान, सुरेश हिरानंदानी, राम मेघानी, मोती अहुजा, अशोक आहुजा, किशोर रंगलानी, सागर बठेजा, जितेश सचदेव, मुकेश असनानी, राहुल बजाज, अजय शादिजा, ओम कुकरेजा, प्यारेलाल भागवानी, गोपाल भागवानी, सुनील परमानी, जय रंगलानी, रूपचंद मोटवानी, बंसी असनानी, राम बालानी, भागचंद रायसिंघानी, द्वारका किंगर, रमेश तनवानी, नानक राजानी आदी उपस्थित होते.


            यावेळी देशाच्या फाळणीच्या स्मृती दिनानिमित्त फाळणीच्या वेळी घडलेल्या घटनांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहण्यास नागरिकांनी गर्दी केली होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या