Ticker

6/Breaking/ticker-posts

वृक्ष लागवड व संवर्धन काळाची गरज -सरपंच नेटके


कोल्हार कोल्हुबाई माता गड पायथ्याशी १००० झाडांचे वृक्षारोपण

जय हिंद फौंडेशन व एस बी आय बँकेचा संयुक्त उपक्रमलोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)  

कोल्हार : जागतिक तापमान वाढी च्या पार्श्वभूमीवर वृक्षांचे रोपण व संवर्धन काळाची गरज बनली असल्याचे आग्रही प्रतिपादन कोल्हारचे सरपंच राजुभाऊ नेटके यांनी व्यक्त केले.


क्षेत्रीय प्रबंधक कार्यालय एस बी आय अहमदनगर व जय हिंद फौंडेशन अहमदनगरच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी सरपंच नेटके बोलत होते.


यावेळी  जेष्ठ मार्गदर्शक महादेव पालवे गुरुजी, सोपानराव पालवे, पोलिस निरीक्षक शंकर डमाळे, सदस्य संदिप पालवे, ईश्वर पालवे, किशोर पालवे, जय हिंदचे अध्यक्ष शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे ,भाऊसाहेब पालवे , चंदु नेटके,  सुनील डमाळे , अक्षय पालवे, विकास पालवे, शैलेश पालवे, मयूर गर्जे, मेजर अशोक जावळे, चंदू पालवे, जय भगवान महासंघाचे मदनशेठ पालवे , विजय पालवे, बाळासाहेब जावळे, रामदास देशमुख, बाबासाहेब जाधव , अशोक गर्जे, महादेव पालवे, आदी उपस्थित होते.


 कोल्हार या ठिकाणी भविष्यात फळ झाडा मुळे पक्षी प्राणी माणूस सर्वांना लाभ मिळेल स्टेट बँक ऑफ इंडिया व जय हिंद फौंडेशन ने गडाचे वैभव मध्ये भर केली आहे आहे या झाडांची काळजी जय हिंद फौंडेशन च्या माध्यमातून घेतली जाणार आहे क्षेत्रिय प्रबंधक कार्यालय स्टेट बँक ऑफ इंडिया अहमदनगर यांचे कार्य उल्लेखनीय  असल्याचे शिवाजी पालवे यांनी सांगितले.

बँकिंग क्षेत्रात काम करत असताना सामाजिक कार्यातही बँकेचा हातभार आहे त्यांनी दिलेली आवळा, सीताफळ, चिंच लिंब ,करंज, जांभूळ हि झाडे आम्ही जगणार असल्याचे पालवे सांगितले‌ आभार मेजर भाऊसाहेब पालवे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या