लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर (प्रतिनिधी) पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाची सामूहिकपणे तयारी करू आणि आपल्या विचारला अनुसरून संमेलन यशस्वी करण्यासाठी साहित्य पंढरीचे आपण सर्वजण भोई होऊ. असे प्रतिपादन शब्दगंध चे मार्गदर्शक प्राचार्य डॉ.जी. पी. ढाकणे यांनी केले.
कोहिनूर मंगल कार्यालयात शब्दगंध साहित्यिक परिषदे चे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी संस्थापक सुनील गोसावी, डॉ.बापू चंदनशिवे, डॉ. श्याम शिंदे. कोपरगांव शाखेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.संजय दवंगे, राहुरी च्या जयश्री झरेकर, श्रीरामपूर चे लेविन भोसले, राजेंद्र चोभे इ. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना प्राचार्य डॉ. ढाकणे म्हणाले की, आगामी पंधराव्या साहित्य संमेलनात सर्वांनी मोठ्या संख्यने सहभाग नोंदऊ व हे संमेलन यशस्वी करू. या संमेलनापुर्वी शब्दगंध च्यां सर्व शाखानी आपल्या तालुक्यात साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करावे.
यावेळी संमेलनाध्यक्ष व स्वागताध्यक्ष निवड, निधी संकलन, तारखा, परीक्षण समिती चा निकाल व जमा खर्च बद्दल चर्चा झाली.सभासदांनी मिळवलेल्या यशा बद्दल डॉ. संजय दवंगे, भारत गाडेकर, प्र.स.डफळ, डॉ.सुदर्शन धस, शर्मिला गोसावी, लेविन भोसले, भगवान राऊत, जयश्री झरेकर यांचे अभिनंदन करुन सत्कार करण्यात आला.
संमेलन पुर्व तयारी बद्दल सविस्तर चर्चा झाली.ऑगस्ट च्या शेवटी किंवा सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात संमेलनाचं आयोजन करण्यात येणार आहे.अशी माहिती राजेंद्र उदागे यांनी दिली.बैठकीचे प्रास्ताविक संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केले. तर शेवटी कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अशोक कानडे यांनी आभार मानले.
या बैठकीस बाळासाहेब शेंदूरकर, सुनील धस, प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर, प्रमोद येवले,ऋता ठाकूर,सौ. सुजाता पवार, जयश्री मतकर यांच्यासह अनेक साहित्यिक, कवी उपस्थित होते.
0 टिप्पण्या