Ticker

6/Breaking/ticker-posts

कै. रावसाहेब म्हस्के यांचे शिक्षण, सामाजिक क्षेत्रात बहुमूल्य योगदान : प्राचार्य गोसावी




टाकळीमानुर येथे श्री भवानी  विद्यालयात  कै. रावसाहेब मस्के यांच्या प्रतिमेला  पुष्पहार करून अभिवादन करताना प्राचार्य गोसावी, समवेत सर्व शिक्षक कर्मचारी . (छाया: विक्रम केदार, टाकळीमानुर)

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)  

टाकळीमानुर : माजी आमदार कै. गरा उर्फ उर्फ रावसाहेब मस्के यांनी आपल्या जीवनामध्ये शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांनी स्वतःला झोकून देऊन काम केले त्यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी जीवन घडविल्यास यशस्वी होतील, असे प्रतिपादन श्री भवानी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मच्छिंद्र गोसावी यांनी केले.


येथील विद्यालयामध्ये ४६ पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.


यावेळी रावसाहेब मस्के स्मृति ट्रस्टच्या वतीने दहावी आणि बारावीतील प्रथम विद्यार्थ्यांना बक्षीस स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी प्रास्ताविक शामसुंदर गुंजकर यांनी केले समीर नरसाळे रमेश मतकर यांची भाषणे झाली उपस्थितांचे आभार सुधीर चव्हाण यांनी मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या