Ticker

6/Breaking/ticker-posts

वृक्षारोपण ही काळाची गरज : शिरसाट ; ॲड. ढाकणे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

 



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)  

टाकळी मानूर 

जीवन जगताना शुद्ध हवा मिळणे आवश्यक आहे शुद्ध हवा मिळण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणं गरजेचं असून  वृक्षारोपण ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन माजी सभापती गहिनीनाथ शिरसाट यांनी केले.  


पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर येथे एडवोकेट प्रताप काका ढाकणे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी वृक्षारोपण करण्यात आले  शिरसाट बोलत होते .


पुढे बोलताना शिरसाट की, सर्वसामान्य वंचित शेतकरी व सर्वसामान्यांसाठी प्रताप काका गेले 30-35 वर्ष संघर्ष करत असून त्यांच्या संघर्षाला न्याय देण्यासाठी त्यांच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन केले.


यावेळी राजेंद्र नागरे , अजित शिरसाट पोपटराव शिरसाट, राजेंद्र गाडे शहादेव शिरसाट, अशोक शिरसाट , अण्णासाहेब शिरसाट, फकीरभाई भीमराव फुदे ,माजी सरपंच अर्जुनराव शिरसाट, लक्ष्मण ठोंबरे, डॉ. नागेश शिरसाट, सोमनाथ शिंदे ,बाबासाहेब मोरे अशोक शिरसाट, देविदस शिरसाट, अश्रुवा खेडकर , पिराजी शिरसाट, बिके ढाकणे, पियू शिरसाट, विक्रम केदार, मुख्याध्यापक परिमल बाबर आदी उपस्थित होते .


 शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आल्याने शाळेच्या वतीने मुख्याध्यापक परिमल बाबर यांनी पोपटराव शिरसाट यांचा सत्कार केला या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते  . आभार अजित शिरसाट यांनी मानले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या