Ticker

6/Breaking/ticker-posts

तिरुपती बालाजी महावारी ; १३० भाविकांचे प्रस्थान

  

  



  लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)  

 शेवगाव : ' धाकटी पंढरी ' वरुर येथील बालाजी ग्रुप आयोजित श्रीक्षेत्र वरुर ते तिरुपती बालाजी महावारीसाठी १३० भाविकांनी  सोमवारी (दिं.१० रोजी) प्रस्थान ठेवले. वारीचे यंदाचे तेरावे वर्ष आहे.आखेगाव येथील जोग महाराज सेवा संस्थांनचे महंत वैराग्यमूर्ती राम महाराज झिंजुर्के व बालाजी भक्त पुरुषोत्तम राठी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून एसटी बस पूण्यासाठी रवाना झाल्या.




    भाविकांचा हा जथ्था रात्री पुणे  स्टेशन येथून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते चेन्नई सुपरफास्ट ट्रेनने तिरुपतीसाठी रवाना झाला.सर्व भाविक मंगळवारी दुपारी तिरुपती येथील रेणीगुंठा जंक्शन येथे पोहचणार आहेत.सर्व भाविकांचा दोन दिवस तिरुपतीत मुक्काम असणार आहे.


      बुधवारी व गुरुवारी भाविक तिरूमला येथील वेंकटाचल पर्वतावरील भगवान श्री बालाजी तसेच तिरुपतीतील पद्मावती, श्रीगोविंदराज स्वामी,श्रीकपिलेश्वर ,इस्कॉन मंदिराला भेटी देऊन दर्शन घेणार आहेत.तर,काहीजण श्रीकालहस्ती व तामिळनाडूतील वेल्लोरच्या गोल्डन टेम्पलला भेट देणार आहेत.गुरुवारी रात्री परतीचा प्रवास सुरू होईल. शुक्रवारी सर्व भाविक वरूरला पोहोचतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या