Ticker

6/Breaking/ticker-posts

संत वामनभाऊ महाराज दिंडीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान

 


 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

    गहिनीनाथ गड :-

 संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांच्या पालखी, दिंडीचे आज रविवार (दि. १८ जून) रोजी दुपारी श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावरून पंढरपुरकडे प्रस्थान होईल. 


 आषाढी वारीसाठी  गडाचे  महंत हभप  विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथुन संत वामनभाऊ महाराज यांच्या दिंडीबरोबर यंदा सुमारे ५० हजारावर वारकरी सहभागी होत आहेत. या भागातील ही सर्वात मोठी दिंडी आहे.


  गुरुपरंपरेनुसार  सकाळी श्रीगहिनीनाथ महाराज व संत वामनभाऊ महाराज यांचा  अभिषेक होईल. त्यानंतर श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथे दुपारच्या महाप्रसाद झाल्यानंतर  चार वाजता  गहिनीनाथ गड येथून अतिशय उत्साहात या भव्य दिव्य दिंडीचा प्रवास सुरू होईल.  निवडुंगा येथे पहिला मुक्काम होईल. 

सोमवारी १९ जूनला वाहिली, सावरगाव, केकानवस्ती, वनवेवाडी असा प्रवास करून मातकुळी ता. आष्टी येथे दिंडीचा दुसरा मुक्काम होईल. 

मंगळवारी २० जूनला जांबवाडी, जामखेड जगदाळे वस्ती असा प्रवास झाल्यानंतर संत वामनभाऊ गड जमादारवाडी येथे दिंडीचे पहिले गोल रिंगण होईल. तसेच  सारोळा येथे दिंडीचा मुक्काम होईल. 


बुधवार २१ जून रोजी सारोळा वस्ती, खुर्दैठण, घोडेगाव, आपटी, पिंपळगाव वस्ती, असा प्रवास करून पिंपळगाव उंडा येथे दिंडी मुक्कामास पोहोचेल.  


गुरुवार दि. २१  जून रोजी सकाळी पिंपळगाव वस्ती, जवळके, जाधव वस्ती, शिंदे वस्ती, चिंचपूर मशिदीचे व भिलारे वस्ती, पांढरेवाडी, आटोळे वस्ती, शेलगाव असा प्रवास करून तांदळवाडी येथे मुक्काम करेल.


 शुक्रवार दि. २३ जून रोजी देऊळगाव, डोणजे कसाबाचे, बंगाळवाडी असा प्रवास करून मिरगव्हाण येथे मुक्काम करील. शनिवार दि. २४ जून रोजी मिरगव्हाण वस्ती, नागोबाचे हिवरे, सालसे, आळसुंदे वस्ती असा प्रवास करून वरकुटे मूर्तीचे येथे दिंडीचा मुक्काम होईल.


 रविवार दि. २५ जून रोजी वरकुटे येथून रोपळे, असा प्रवास झाल्यानंतर आठरे येथे दिंडीचे दुसरे रिंगण होईल.  त्यानंतर भोगेवाडी वस्ती, भोगेवाडी येथे मुक्काम होईल. सोमवार दिनांक २६  जून रोजी ढवळस, पिंपळखुंटे, अंबड, शिराळाचे गोठे, भेंड असा प्रवास करून संत सावता महाराज यांचे श्रीक्षेत्र अरण येथे दिंडीचा मुक्काम होईल. 

मंगळवार दि. २७ जून रोजी बारडी, जाधव वाडी, पवार वस्ती फाटा,  मेंढापूर पाटील वाडा असा प्रवास करून पादुका रिंगण होईल व दिंडी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचेल. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या