Ticker

6/Breaking/ticker-posts

ग्रामसेवक प्रबोधन पायी दिंडीची सांगता



 
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर:   पंढरपूर येथे विदर्भातील शेतकरी नेतृत्व रविभाऊ तुपकर ,जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष व ग्रामसेवक संघटनेचे राज्य सचिव  माननीय प्रशांत जामोदे साहेब,ग्रामसेवकांचे राज्याचे नेते  एकनाथराव ढाकणे , ग्रामसेवक  संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष  शरद भुजबळ, अशोकराव काळे जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ बुलढाणा  जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर  काळे साहेब, गटविकास अधिकारी पंचायत समिती पंढरपूर व अहमदनगर जिल्हा ,सोलापूर जिल्हा व राज्यातील ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत पार  पडला.  
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
आनंदे केशवा भेटताची
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी
पाहिली शोधोनी अवघी तीर्थे

पंढरपूर देवस्थानच्या वतीने ग्रामसेवक प्रबोधन दिंडीचा सन्मान करण्यात आला.  वर्षभर शासकीय कामाची व प्रापंचिक जबाबदारी पार पाडत असताना आपण स्वत:ला विसरुन जातो. शरीर थकते मानसिक ऊर्जा कमी होते. तिच प्राप्त करण्यासाठी वारी हेच एकमेव माध्यम आहे .तेथे सर्व मनोकामना पुर्ण होते .म्हणून तर लाखो भक्त न चुकता... न थकता...वारी करतात. तेथील चैतन्य अनुभवण्यासाठी एकदा तरी वारी करावी, असे  आवाहन एकनाथराव ढाकणे  यांनी केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या