Ticker

6/Breaking/ticker-posts

भर बाजारपेठेत पहाटे शेवगावला सशस्त्र दरोडा..! दोन ठार; एक गंभीर , जिल्हाभर खळबळ ,आज शेवगाव बंद

  लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


जगन्नाथ गोसावी 

शेवगाव- शेवगाव शहरातील भर बाजारपेठेतील मारवाडी गल्लीत आडत व्यापारी  बलदवा यांच्या घरावर आज शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास  दरोडेखोरांनी बलदवा कुटुंबावर  हल्ला चढविला .या जबर मारहाणीत गोपीकिसन गंगाकिसन बलदवा आणि त्यांच्या मोठ्या भावजय पुष्पा हरिकिशन बलदवा यांची हत्या करण्यात आली. तसेच यावेळी सुनीता रामकिसन बलदवा याही गंभीर जखमी झाल्या.  या घटनेने जिल्हाभर एकच खळबळ उडाली असून घटनेच्या निषेधार्थ आज विविध संघटनांच्या वतीने शेवगाव बंदची हाक देण्यात आली आहे. याबाबत घटनेची अधिक माहिती अशी,  भर बाजारपेठेत आडत व्यापारी बलदवा यांचे निवासस्थानही आहे. काल गुरुवारी रात्री नियमित व्यवहार आटोपून  बलदवा कुटुंबीय झोपले असता दरोडेखोरांनी आज शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घराचे कडी, कोयंडे तोडून घरात प्रवेश केला. बलदवा कुटुंब झोपेत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. या हल्ल्यात गोपीकिसन यांच्या डोक्याला धारदार शस्त्राने वार झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच ठार झाले.  तर त्यांच्या भावजय पुष्पा बलदवा यांच्यावरही दरोडेखोरांनी जबर हल्ला चढवला. त्यांच्याही डोक्याला पायाला तसेच अंगावर तीक्ष्ण  वार झाल्याने, त्याही जागीच गतप्राण झाल्या. या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर संगीता बलदवा या गंभीर जखमी झाल्या आहेत.  त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


 घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगाव पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील, प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी रेड्डी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपासाच्या सूचना दिल्या .


दरम्यान दरोडेखोरांना जर सोने- नाणे , पैसे चोरून न्यायचे होते , तर असा जीवघेणा हल्ला करण्याचे कारण काय ? केवळ धमकावून  जुजबी  मारहाण करूनही त्यांना लूट करता आली असती.  बलदवा हे सरळसोट व्यापारी असल्याने त्यांचे कोणाशी वैर नव्हते,  परंतु या जिवघेण्या हल्ल्यामागे काहीतरी गौडबंगाल असावे ? किंवा दरोडेखोरांची आडनाव  साधर्म्यमुळे काहीतरी गफलत झाली असावी. अशीही  चर्चा आहे.  तथापि पोलीस तपासात सत्य काय ते लवकरच बाहेर येईल, मात्र या घटनेने संपूर्ण शेवगाव ,पाथर्डी आणि संपूर्ण नगर जिल्हा हादरून गेला आहे. 

घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे नेते ॲड.  प्रतापराव ढाकणे यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच संपूर्ण माहिती घेऊन ते म्हणाले, की काही कारणामुळे शेवगाव गेले महिनाभर बंद होते. आता कुठे परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.  यात  दोघांना जीव गमाव लागला .मागील आठवड्यात आमचे मित्र संजय गुरसाळे यांची पाथर्डीत अशीच हत्या झाली होती. हे हत्यासत्र कधी थांबणार ? सवाल उपस्थित करून शेवगाव, पाथर्डी सुरक्षित आहे का? पोलिसांचा वचक राहिला नाही, मी यापूर्वीच शेवगाव, पाथर्डी साठी प्रत्येकी दोन पोलीस ठाणे मंजूर करण्याची मागणी केली होती. त्याचि दखल  घेतली गेलेली नाही. शेवगाव -पाथर्डीसह जिल्ह्याचा आता बिहार झाला आहे .अशी बोचरी टीका करून ढाकणे यांनी बलदवा  यांना श्रद्धांजली वाहिली .


तसेच घटनेची माहिती मिळताच विविध पक्षाचे नेते , कार्यकर्ते, पदाधिकारी यांची घटनास्थळाकडे रीघ लागली असून आज शेवगाव बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या