Ticker

6/Breaking/ticker-posts

भागानगरे हत्याकांड प्रकरणी तिघे अटकेत

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर : येथील बालिकाश्रम रस्त्यावर मंगळवारी (दि. 20) रोजी पहाटे झालेल्या ओंकार भागानगरे खून  प्रकरणातील आरोपींना सहकार्य करणाऱ्या तीन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.  मुख्य तीनही आरोपी मात्र अद्याप फरार आहेत.


माळीवाडा परिसरातील अवैध धंद्यांची माहिती दिल्याचा राग मनात धरून ओंकार भागानगरे व त्याच्या मित्रांवर बालिकाश्रम रस्त्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात ओंकार भागानगरे याचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी गणेश हुच्चे, नंदू बोराटे व संदीप गुडा यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती.   त्यावरून खून, जीवघेणा हल्ला व अवैध शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला होता. 


पोलिसांकडून तपासात या प्रकरणात आरोपींना मदत केल्यावरून या तिघांना अटक केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या