Ticker

6/Breaking/ticker-posts

नगर शहर बार असोसिएशनची निवडणूक ;अध्यक्षपदी अॅड. संजय पाटील



 उपाध्यक्षपदी राजाभाऊ शिर्के यांची तर  सचिवपदी गौरव दांगट 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर  -  अहमदनगर बार असोसिएशनच्या पदाधिकारी निवडणुकीसाठी मंगळवारी जिल्ह्य न्यायालयात मतदान झाले व त्याच दिवशी मतमोजणी झाली. या निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराने माघार न घेतल्याने सर्व जागांची निवडणूक बहुरंगी झाली. ११७९ मतदारांपैकी ७९७ मतदारांनी मतदान केले. दुपारी मतदान प्रक्रिया संपल्यावर सायंकाळी लगेचच मतमोजणी झाली. रात्री उशिरा सर्व निकाल हाती आले. या निवडणुकीत अध्यक्षपदी अॅड. संजय पाटील व 

यांनी विजय मिळवला. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. एल.के.गोरे  यांनी रात्री साडे अकरा वाजता निकाल जाहीर केल्यावर जिल्ह्य न्यायालयात वकिलांनी जल्लोष करत गुलालाची उधळून विजयोत्सव साजरा केला.  कार्यकारणी सदस्य पदी निवडून आलेले अॅड.रोहित कळमकर यांनी ५८३ सर्वाधिक मते घेवून विजय मिळवला. यावेळी संघटनेचे मावळते अध्यक्ष अॅड.अनिल सरोदे व उपाध्यक्ष अॅड. संदीप वांढेकर यांनी सर्व नूतन पदाधिकारींचे अभिनंदन केले.

अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत उमेदवार अॅड. संजय पाटील यांना ३६६ मत मिळाली तर विरोधातील अॅड. स्वाती पाटील यांना २१३ मते व अॅड.सुनील सूर्यवंशी २०२ मते मिळाली. उपाध्यक्ष पदासाठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत उमेदवार अॅड. राजाभाऊ शिर्के (२०९ ) यांनी अॅड. भगवान कुंभकर्ण ( २०६ ) यांच्यावर  केवळ 3 मतांनी विजय मिळवला. उपाध्यक्षपदासाठी अन्य उमेदवारांना मिळालेली मते अशी अॅड. अजित वाडेकर (२०४), अॅड.अनुराधा येवले (१७०).

सचिव पदी विजयी झालेले अॅड. गौरव दांगट ( ५३४ ) यांनी विरोधक अॅड.प्रवीण पालवे (२४३ ) यांच्यावर विजय मिळवला. सहसचिव पदी विजय झालेले अॅड.अजिंक्य काळे (५४० ) यांनी विरोधी अॅड. महेश शिंदे (१९७ ) यांच्यावर विजय मिळवला. महिला सहसचिवपदी विजयी झालेल्या अॅड. अशा गोंधळे (४३५ ) यांनी विरोधी अॅड. आरती गायकवाड (२२१) व अॅड. सरिता साबळे (११३) यांच्यावर मात केली खजिनदार पदी विजयी झालेले अॅड. सुनील तोडकर (३९८) यांनी विरोधक अॅड.शिवाजी शिरसाठ (३६१) यांच्यावर विजय मिळवला. महिला कार्यकारणी पदी विजयी झालेल्या अॅड. प्रिया जगताप (३९३) यांनी अॅड.प्रणाली भुयार (३४८) यांच्यावर मात केली.

कार्यकारणी सदस्यपदी निवडून आलेले उमेदवार व त्यांना मिळालेले मत असे,  अॅड.रोहित कळमकर (583), अॅड. नितीन खैरे (549), अॅड. रामेश्वर कराळे (534), अॅड. विशाल पठारे (521), अॅड.रावसाहेब चौधरी (479), अँड.अभिजीत पुप्पाल(436). पराभूत झालेले उमेदवार असे अॅड. सुदाम गवते (३९१ ), अॅड.सुदाम साठे (३३०) व अॅड.अय्याज बेग (३१३)

नूतन अध्यक्ष अॅड. संजय पाटील म्हणाले, वकील संघटनेच्या निवडणुकीत सर्व वकील सहकाऱ्यांनी केलेल्या अमुल्य सहकार्याने माझी अध्यक्षपदी निवड झाली आहे. एक वर्षाच्या कालावधीत वकिलांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार असून सर्वांना बरोबर घेत काम करणार आहे. त्याच बरोबरच नवनवीन उपक्रम वकिलांसाठी राबविणार आहे.

नूतन उपाध्यक्ष अॅड. राजाभाऊ शिर्के म्हणाले, जिल्हा न्यायालयात वकिलांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी सर्व निवडून आलेले पदाधिकारी घेणार असून बार असोसिएशनला कोणतेही गालबोट लागणार नाही असे आश्वासन देतो.

नूतन सचिव अॅड.गौरव दांडगे म्हणाले, जिल्हा न्यायालयात न्यायिक अधिकारी व वकिलांमध्ये चांगला समन्वय राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. वकिलांसाठी वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू. असे सांगितले

निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे समर्थक वकील यावेळी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. निकाल घोषित होताच मोठ्याप्रमाणात गुलालाची उधळण न्यायालयात करण्यात आली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या