Ticker

6/Breaking/ticker-posts

नगरच्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त १९ नोव्हेंबरला होणार शानदार शुभारंभ


  खासदार डॉ.सुजय विखे पाटील व आमदार संग्राम भैया जगताप यांची माहिती





लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर, दि.31 : अहमदनगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाचे पूर्ण होवून दि.19 नोव्हेंबर 2022 रोजी, केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती खासदार डॉ.सुजय विखे यांनी दिली. आज खासदार डॉ.सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी वाहनातून सफर घडविली. हे वाहन स्वतः खासदार विखे पाटील यांनी चालवत उड्डाणपुलावरून वाहन चालविण्याचा आनंद घेतला. या वेळी उड्डाणपुलावर उपस्थित पत्रकारांशी बोलताना खासदार विखे पाटलांनी या उड्डाणपुलाचे उद्घाटन कधी व कसे होणार याबाबत माहिती दिली.

यावेळी राष्ट्रीय महामार्ग नवी दिल्ली येथील अधिकारी एस के मिश्रा,आशिष् आसाटी, पी जी खोडस्कर,अंशुमती श्रीवास्तव,पी बी दिवाण,एम एस वाबळे,दिपेंद्र राठोड,दिग्विजय पाटणकर,क्रीशेंद्रा ड्रीवेदी,राजा मुखर्जी,महेश मिश्रा,दिबॅंड पॉल,अलोक कुमार सिंग ,संदीप पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, उड्डाण पुलाच्या माध्यमातून नगरकरांच्या स्वप्न पूर्ण झाले आहे. मी व आमदार संग्राम जगताप आम्ही दोघांनीही जो संकल्प  केला होता तो पूर्ण झाला आहे.  या माध्यामातून नगर जिल्ह्याच्या सौंदर्यकारणात भर पडली आहे. या कामासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. कै.खा.दिलीप गांधी यांनी देखील उड्डाणपूल मंजुरीसाठी पाठपुरावा केला होता. नगरकर आता समाधान व्यक्त करु लागले आहे. तसेच २० नोव्हेंबरपासून नगरकरांसाठी हा उड्डाणपूल खुला होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, उड्डाणपुलाच्या माध्यमातून नगर शहराच्या वैभवात भर पडली आहे. केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 19 नोव्हें रोजी लोकार्पण सोहळा होणार आहे. उड्डाणपूलाच्या कामाबरोबरच नगर शहरातील  विविध रस्त्यांची कामे सुरु झाली आहेत.  नगरकरांनी उड्डाणपुलाच्या कामासाठी मोठी मदत केली आहे. व होणारी अडचण सहन करुन विकास कामाला साथ दिली.

उड्डाणपुलावर आतषबाजी

नगर शहरातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या दिवशी रात्री उड्डाणपुलावर आतषबाजी करण्यात येणार आहे. या संदर्भात खासदार विखे पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ही आतषबाजी नगरकरांना पाहता येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या