Ticker

6/Breaking/ticker-posts

दहिगाव-नेत माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे सीमोल्लंघन..! ; एकमेकांना सोनं देत ,लुटला दसरा सणाचा आनंद ..

    


       लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

शेवगाव : ' दसरा सण मोठा, आनंदाला नाही तोटा ' या उक्तीप्रमाणे दिवंगत लोकनेते मारुतराव घुले पाटील यांची कर्मभूमी असलेल्या शेवगाव तालुक्यातील दहिगाव - ने येथे दसरा सण पारंपरिक पद्धतीने व उत्साहात साजरा करण्यात आला. 


ग्रामस्थांबरोबर सण, उत्सव साजरे करण्याची लोकनेते मारुतराव घुले पाटलांची शिकवण व परंपरा माजी आमदार नरेंद्र घुले पाटील व चंद्रशेखर घुले पाटील बंधूंनी जोपासली आहे.

    

काल विजयादशमीला व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत सायंकाळी चंद्रशेखर घुले यांनी ग्रामस्थांसोबत उत्साहात व आनंदात दसऱ्याचा सण साजरा केला. खंडोबा मंदिर येथे सीमोल्लंघन करत एकमेकांना आपट्याची पाने सोनं म्हणून भेट दिली.घुले बंधू नगरला स्थायिक असले तरी ते प्रत्येक सणवार आपल्या दहिगाव-नेच्या वाड्यावर साजरे करतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या