Ticker

6/Breaking/ticker-posts

राज्यस्तरीय बीज प्रक्रिया स्पर्धेत शोभा वावरे जिल्हात द्वितीय ; ' धाकट्या पंढरी ' च्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

 


 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 शेवगाव : दि. ३ ऑक्टोंबर २२

 महाराष्ट्र शासन कृषी विभाग,आरसीएफ व तिफन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या खरीप हंगाम 2022 राज्यस्तरीय बीज प्रक्रिया स्पर्धेत महिला गटातून जिल्हास्तरावर वरुर खुर्द (ता.शेवगाव)येथील प्रगतशील महिला शेतकरी सौ. शोभा गोरख वावरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला असून त्यांचा लवकरच स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.या राज्यस्तरीय स्पर्धेच्या निकालाने ' धाकटी पंढरी ' असा लौकिक असलेल्या वरुरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

     

 ऑनलाइन स्पर्धेसाठी सौ. वावरे यांनी तूर कडधान्य पीकासंदर्भात जैविक बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक व्हिडिओद्वारे सादर केले होते,या कामी त्यांना कृषी सहाय्यक सुवर्णा मुरदारे यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत नवनवीन प्रयोग करून भरघोस उत्पन्न घेण्यात वावरे दांपत्य वरुर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.

'काळी आई' आमचे दैवत आहे. 

नवरात्रोत्सवाच्या पर्वकाळात स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्याचा मनस्वी आनंद आहे.आमचे शेतकरी कुटुंब असून 'काळी आई' आमचे दैवत आहे. ' कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी ' या संत वचनाप्रमाणे कार्य सुरू आहे.

- सौ.शोभा गोरख वावरे


   या यशाबद्दल तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले, मंडळ कृषी अधिकारी गणेश वाघ,कृषी पर्यवेक्षक प्रकाश कांबळे,वरूर सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन मधुकर वावरे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या