Ticker

6/Breaking/ticker-posts

सम्राट प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श शिक्षकांचा सन्मान

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क

 बोधेगाव ( ता.शेवगाव ):- दि ३०.

सम्राट प्रतिष्ठान दत्तनगर बोधेगाव तर्फे   शारदिय नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून शेवगाव तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देउन गौरविण्यात आले. 


यामध्ये बोधेगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. शंकरराव गाडेकर  यांनाही आदर्श शिक्षक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नारीशक्तीचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आला. पार्थ पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका सारिका  देशमुख तसेच सनराईज पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रतिभा  गर्जे यांच्यासह   रेसिअन्शिअल हायस्कूल, शेवगांवचे प्राचार्य बालाजी गायकवाड.  जिल्हा परिषद शाळा बोधेगाव येथिल उपक्रम शिक्षक  किरण  बैरागी, जिल्हा परिषद शाळा हातगाव येथिल उपक्रमशील शिक्षक  विष्णू  वाघमारे , जिल्हा परिषद शाळा खामपिंपरी येथिल सतिष पठाडे , शिवाजी हायस्कूल प्राध्यापक  अशोकराव मोरे, जिल्हा परिषद शाळा सुकळीचे . संतोष पवार ,  युनिव्हर्सल अँकॅडमीचे अध्यक्ष नवाब वहाब शेख आदींना शिक्षकांना सम्राट प्रतिष्ठानच्या वतीने     ट्रॉफी ,शाल ,श्रीफळ आणि पुस्तक भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला .


  याप्रसंगी  डॉ. शंकरराव गाडेकर  यांनी  आपल्या मनोगतनातून मेहनतीने व परिश्रमाने एखादी गोष्ट कशी साध्य करावी आणि आजवर मी  शिक्षक ते विस्तार अधिकारी होण्यापर्यंत माझा प्रवास वर्णन  करून सम्राट प्रतिष्ठान  वतीने  राबविण्यात येत असलेल्या या विशेष उपक्रमाचे कौतुक केले. 


या कार्यक्रमासाठी भाजपा ओबीसी युवा मोर्चाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोक गाडे हे उपस्थित होते . यावेळी पार्थ पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष  भरत देशमुख  यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.  यावेळी या  कार्यक्रमाचे सम्राट प्रतिष्ठाण चे संयोजक  संस्थापक मिसळ भाऊसाहेब,  माजी अध्यक्ष तथा बोधेगाव ग्रा. पं.सदस्य  शहादेव गुंजाळ, विद्यमान अध्यक्ष विष्णू रुपनर यांनी उपस्थित मान्यवरांचे विशेष आभार मानले.


 या कार्यक्रमासाठी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस एकनाथ उर्फ बाबा सावळकर , पार्थ पब्लिक स्कूल संस्थापक अध्यक्ष भरत देशमुख ,  शेवगाव तालुका बहुजन वंचित आघाडीच्या  महिला अध्यक्षा संगीताताई ढवळे, रंजनाताई गायकवाड  प्रमोद तांबे , विकास गाडे  एन.डी आगळे, प्रा.अर्जुन गायकवाड  , सामाजिक कार्यकर्ते मुनावर शेख ,विनोद ससाने, फिरोज पठाण, मुबारक सय्यद ,महेश ससाणे, आदी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  कुशाबा पलाटे यांनी केले तर आभार मुनावर शेख यांनी मानले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या