Ticker

6/Breaking/ticker-posts

हिंमत असेल तर पुढे या...! खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचे आ.प्राजक्त तनपुरेना ' ओपन चॅलेंज..!'

 
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

राहुरी-दि. ३०

 ऊस उत्पादकांचे देणे, कामगारांचे थकीत पेमेंट, मोडकळीस आलेली कारखान्याची यंत्रणा आणि जिल्हा बँकेची थकबाकी अशा अवस्थेत आपण कारखाना चालविण्याची तयारी दाखविली ती केवळ सर्व सामान्य शेतकरी, ऊस उत्पादक आणि कामगारांसाठी.. परंतु निवडणूक आली की, यांना आता पुळका आला आहे, तरीही आमची हरकत नाही , मात्र ,हिंमत असेल तर पुढे या...! आधी कारखाना चालवून दाखवा..मग  आरोपाच्या पोकळ गप्पा मारा असे ओपन चॅलेंज खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आ. प्राजक्त तनपुरेना त्यांचे नाव न घेता दिले.


बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज झाली. या सभेत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांचा नामोल्लेख टाळत टीकेची झोड उठविली.


सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे होते. उपाध्यक्ष दत्तात्रेय ढूस, ज्येष्ठ नेते ॲड. सुभाष पाटील, उदयसिंह पाटील, शामराव निमसे, चाचा तनपुरे, तान्हाजी धसाळ, उत्तम म्हसे, शिवाजी डौले, आर. आर. तनपुरे, राजेंद्र उंडे, प्रभारी कार्यकारी संचालक भाऊसाहेब सरोदे उपस्थित होते.


खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, तनपुरे साखर कारखान्याचा सभासद नाही. तालुक्याबाहेरचा पाहुणा कलाकार आहे. कारखान्याची जबाबदारी सहा वर्षे यशस्वीपणे सांभाळली. आता तालुक्याने ज्यांना आमदार केले. मंत्री झाले. आजोबांच्या नावाने कारखाना आहे. त्यांनी पुढाकार घ्यावा. जबाबदारी घ्यावी. मी स्वतः तुमच्या ताब्यात कारखाना देतो." अशा शब्दात खासदार डॉ. सुजय विखे यांनी टीका केली.


खासदार डॉ. विखे म्हणाले, "कारखान्याच्या कामगारांचे थकीत देणे अदा करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाने शासनातर्फे कारखाना मालिकेच्या जमिनींची लिलाव प्रक्रिया होत आहे. त्यात आमचा संबंध नाही. मागील सहा वर्षात मशिनरीचे आधुनिकीकरण केले. गाळप क्षमता अठराशे वरून चार हजार पर्यंत वाढविली. मागील हंगामात अकरा वर्षातील उच्चांकी गाळप, उच्चांकी साखर उतारा घेतला. कामगारांचे नियमित वेतन दिले. शेतकऱ्यांची राहिलेली ऊस बिले देणार आहे."


पुढे म्हणाले की, "कारखान्याची निवडणूक घ्यावी. म्हणून उच्च न्यायालयात याचिका करणे. पत्रकार परिषद घेऊन कारखाना बचाव कृती समिती स्थापन करण्याची; आंदोलन, संघर्ष, रस्त्यावर उतरण्याची गरज नाही. कारखाना तुमचा आहे. तुम्हीच चालवा. संचालक मंडळाची यादी द्यावी. स्वतःहून कारखान्याची जबाबदारी द्यायला तयार आहे. आम्ही भ्रष्टाचार केला. असे वाटत असेल तर कोणत्याही चौकशी तयार आहे."


"कारखान्याच्या कर्जाच्या वसुलीसाठी जिल्हा बँकेने प्रत्येक साखर पोत्यामागे पाचशे रुपयांची टॅगिंग मागितली आहे. त्यामुळे सभासदांना योग्य ऊसदर देणे अशक्य आहे. बँकेने पाचशे ऐवजी साडेतीनशे रुपये टॅगिंगची अट ठेवून कारखाना चालविण्याची निविदा काढावी. राज्यातील कुणीही पुढे येणार नाही.‌ बँकेने आम्हाला शंभर रुपये टॅगिंग मान्य केल्यास येत्या महिन्याभरात कारखान्याचा हंगाम चालू करू. असेही खासदार डॉ. विखे यांनी सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या