लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
खरवंडी कासार :
पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे ई पिक नोंदणी कार्यशाळा शेतक-र्यांच्या उपस्थीतीत प्रत्यक्ष शेतात जाऊन ईपिक नोदणी करण्याचे प्रात्यक्षीक दाखवत मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली.
खरवंडी कासार सजाचे कामगार तलाठी जालिंदर सांगळे यांनी सदर ईपिक कार्यं शाळेचे आयोजन केले होते . यावेळी तलाठी सांगळे म्हणाले, जवळपास घराघरात मोबाईल आहेत आपल्या मोबाईल मध्ये ईपिक पाहणी व्हर्जन टू हे अॅप्स प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करा आपली वैयक्तीक माहिती भरावी.
शेतकऱ्यांनी गट नंबर सर्वें नंबर पिकाची माहीती पिकाचा फोटो अपलोड करून माहीती प्रविष्ठ करा तरी सर्वं शेतकरी वर्गाने ईपिक नोदणी करूण घ्यावी असे आवाहन केले आहे जनजागृतीसाठी कोतवाल रामदास गायकवाड प्रदिपदेवा पाठक सहाय्य करत आहेत यावेळी कापूस ऊस पिकाचे ईपिक नोंदणी प्रात्यक्षीक नोंदणी करून दाखवण्यात आले
0 टिप्पण्या