Ticker

6/Breaking/ticker-posts

रुग्णांना दिली जनावरांची औषधे; बोगस डॉक्टरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

पाथर्डी: पाथर्डी तालुक्यातील खंडोबावाडी येथील रुग्णांना जनावरांची औषधे दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकरणी एका बोगस डॉक्टरचा पर्दाफाश करत तालुका आरोग्य विभागाने या डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या बोगस डॉक्टरचे नाव राजेंद्र सदाशिव जंजाळ (रा.कारंजा रस्ता बीड) असे आहे.


एका औषध विक्रेत्या दुकानदाराने दाखवलेल्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. या संदर्भात अधिक माहिती मिळते की,तालुक्यातील करंजी लगत असलेल्या खंडोबाची वाडी येथे राजेंद्र जंजाळ याने तीन दिवसांपूर्वी दवाखाना सुरू केला. त्याच्या दवाखान्यात जनावरांना देण्यात येणारी औषधे व इंजेक्शनचा साठा होता.तीन दिवसांपासून तो रुग्णांवर उपचार करत होता. जंजाळ याने दिलेली औषधाची चिठ्ठी घेऊन एक रुग्ण करंजी येथील एका मेडिकल दुकानात गेला. 


दुकानदाराने ही चिठ्ठी पाहताच या वर लिहिलेली औषधे ही जनावरांची असून तुम्ही ती घेऊ नका असा सल्ला रुग्णाला दिला तर त्या नंतर या दुकानदाराने या प्रकारची माहिती करंजी च्या आरोग्य उपकेंद्राचे अधीक्षक डॉ. दिलीप तांदळे यांना कळवली.तांदळे यांनी जंजाळ याला ताब्यात घेत तिसगाव येथील उपकेंद्रात आणत या प्रकरणाची माहिती तालुका आरोग्य अधिकारी व तिसगाव उपकेंद्राचे अधीक्षक डॉ. बाबासाहेब होडशीळ यांना दिल्या नंतर त्यांनी या डॉक्टरचे सर्टिफिकेट पाहिले असता ते बनावट असल्याचे आढळून आले तर त्याच्या कडे जी औषधे होती ती जनावरांना लागणारी होती. या संदर्भात डॉ. बाबासाहेब होडशीळ यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत जंजाळ याला बेड्या ठोकल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या