Ticker

6/Breaking/ticker-posts

डमाळवाडीच्या "एक गाव एक गणपती" संकल्पनेचा आदर्श सर्वांनी घ्यावा- वृक्षमित्र शिवाजी पालवे

 



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 पाथर्डी :- तालुक्यातील डमाळवाडी या गावाने एक गाव एक गणपती हे संकल्पना राबवली असून डमाळवाडी गावामध्ये संपूर्ण गाव एकत्रित येऊन एक गणपती बसवला आहे गेल्या वर्षी याच गावामध्ये दहा ते बारा गणेश मंडळ होती परंतु गावाने एकत्र येऊन निर्णय घेऊन एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली त्याबद्दल जय हिंद फाउंडेशन अहमदनगर च्या वतीने डमाळवाडी गावाला विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .


यावेळी फाउंडेशनचे शिवाजी पालवे शिवाजी गर्जे महादेव शिरसाट ग्रामपंचायत डमाळवाडी चे सरपंच रामनाथ शिरसाट मा  सरपंच अंबादास डमाळे भानुदास पालवे आनंद शिरसाट अशोक पोटे संदीप शिरसाट रतन शिरसाट भैरू डमाळे अनिकेत डमाळे कर्ण डमाळे संतोष डोंगरे साहेबराव सानप विक्रम सानप अशोक डमाळे ठकाजी डमाळे सर मोहन शिरसाट आदिनाथ डमाळे सुखदेव डमाळे गणेश शिरसाट सतीश डमाळे दगडू डमाळे आदी उपस्थित होते यावेळी पालवे यांनी डमाळवाडी गावचे कौतुक केले डमाळवाडी गावातील तरुणांनी एकत्र येऊन जी गावकऱ्यांना साथ दिली ती खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळात गावाला विकासाकडे नेण्यासाठी खूप मोठे कार्य करेल डमाळवाडी गावाने घेतलेला निर्णय अहमदनगर जिल्ह्याला हेवा वाटेल अशा पद्धतीचा आहे जिल्हा प्रशासनाने व तालुका प्रशासनाने डमाळवाडी गावचा गौरव करून या गावाला बक्षीस दिले पाहिजे असे शिवाजी पालवे म्हणाले .


सरपंच रामनाथ शिरसाठ यांनी जय हिंद फाउंडेशनच्या वतीने दिलेला पुरस्कार हा संपूर्ण गावाचा सन्मान असून या पुरस्कारामुळे आम्हाला खूप मोठा आनंद वाटत आहे माजी सरपंच आमदार डमाळे यांनी जय हिंद फाउंडेशनच्या आभार व्यक्त करत असताना सांगितले डमाळवाडी गावाने आपसातील सर्व भेद मिटून गावाच्या विकासासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यामुळे गावामध्ये एक चैतन्य निर्माण झाला असून तरुण एकत्र आले असून गावकरी एकत्र आलेत व गावामध्ये एक गाव एक गणपती संकल्पना पूर्णत्वास आली आज आमच्या गावाला जय हिंद फाउंडेशन अहमदनगर कडून विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल फाउंडेशनचे आभार त्यांनी मानले .


जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून चांगले कार्य करणाऱ्या गावांना येणाऱ्या काळात देखील सन्मानित करण्यात येणार असल्याचे शिवाजी पालवे यांनी सांगितले आभार महादेव शिरसाट यांनी मानले


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या