Ticker

6/Breaking/ticker-posts

चैतन्य इन्शुरन्सला फ्युचर जनरलीचा बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड ;चैतन्यचे संचालक पत्रकार किशोर मरकड यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर- येथील चैतन्य ट्रॅव्हल्स व इन्शुरन्स या फर्मला फ्युचर जनरली इन्शुरन्स यावर्षीचा बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला कंपनीचे ऑपरेशनल ऑफिसर निलेश परमार व व्हॉइस प्रेसिडेंट नितीन मलकान यांच्या उपस्थितीत चैतन्यचे संचालक पत्रकार किशोर मरकड यांनी हा पुरस्कार स्वीकारला.


कंपनीचा पंधरावा वर्धापन दिन नगर येथील ब्रँच कार्यालयात साजरा करण्यात आला त्यावेळी येत्या काळात उत्कृष्ट व्यवसाय करणाऱ्या विमा सल्लागार प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.


झोनल मॅनेजर दीपेश लुंकड, विभाग प्रमुख सचिन पिंपूरणे, आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना परमार म्हणाले की देशात 190 वर्ष जुनी असलेली जनरली इन्शुरन्स व फ्युचर ग्रुपने एकत्र येऊन पंधरा वर्षांपूर्वी इन्शुरन्स कंपनीची स्थापना केली. पॉलिसीधारकांना भविष्यातील गरजा आणि परतावा लक्षात घेऊन कंपनीने विविध पॉलिसी बाजारात आल्या निश्चितच त्या लाभदायी ठरणार आहे त्यामुळेच कंपनीने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे.


 यावेळी बोलताना चैतन्य इन्शुरन्सचे संचालक किशोर मरकड म्हणाले की गेले ते वीस वर्ष जाहिरात ट्रॅव्हल्स या व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही नगरकरांना परिचित आहोत आता याच जोडीला इन्शुरन्स मध्ये पदार्पण केले असून अल्पावधीत याही व्यवसायात आम्ही प्रगती केली आहे. हे काम करत असताना कंपनीचे नगरचे ब्रँच मॅनेजर गिरीश खांदवे व त्यांचे विमा सल्लागार प्रतिनिधी अमित देशमुख यांचे मौलिक सहकार्य लाभल्यामुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले यावेळी महाराष्ट्राचे झोनल ट्रेनर सुमित महाजन ऑपरेशन मॅनेजर सचिन कुलांगे आदींसह कंपनीचे अधिकारी विमा सल्लागार व विमा प्रतिनिधी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या