लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव : दि.६ सप्टेम्बर
२०२२
आगामी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने शेवगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक विलास पुजारी यांचे मार्गदर्शनाखाली शनिवारी (दिं २७ रोजी) सकाळी शहरात पोलिसांचे शानदार संचलन करण्यात आले.
पोलीस स्टेशन, शिवाजी चौक, मुख्य बाजारपेठ, भगतसिंग चौक, नाईकवाडी मोहल्ला, क्रांती चौक, आंबेडकर चौक आदी मुख्य मार्गाने हे संचलन करण्यात आले.संचलन पाहण्यासाठी नागरिकांनी दुतर्फा गर्दी केली.
संचलनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, आशिष शेळके, रवींद्र बागुल आदी अधिकाऱ्यांसह गोपनीय शाखेचे अंमलदार बप्पासाहेब धाकतोडे, वाहतूक शाखेचे अंमलदार राहुल खेडकर तसेच २६ पोलीस अंमलदार व गृहरक्षक दलाचे १० जवान सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या