Ticker

6/Breaking/ticker-posts

अखेर शिवसेनेचेच सीमोल्लंघन..!शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार!! ; मुंबई उच्च न्यायालयाने दिला 'हा' निर्णय

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)    

मुंबई :- दि. २२ सप्टेंबर २०२२

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत एक महत्त्वाची बातमी हाती आली असून दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरून  शिवसेना व मुख्यमंत्री शिंदे गटात चढाओढ  सुरू होती.  याबाबत शिंदे   गटाच्या  आमदारांनी मुंबई उच्च न्यायालयात उद्धव ठाकरे यांना मेळावा  घेण्यास अटकाव करण्याची  दाखल केलेली  याचिका न्यायालयाने फेटाळून  लावली आहे.  त्यामुळे  शिवसेनेचा अनेक वर्षापासूनचा पारंपारिक मेळावा शिवाजी पार्कवर  घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 


येथेच मेळावा घेण्यासाठी  दोन्ही  गटांचा  प्रयत्‍न  होता. पोलिसांच्या अहवालावरून मुंबई महापालिकेने  दोन्ही गटांना कालच परवानगी नाकारली होती. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळणार नाही असे पत्रच महापालिकेने दोन्ही गटांना दिले आहे. मात्र  उच्च न्यायालयात दाखल याचिकेचा निर्णय आज होता,  तो शिवसेनेच्या बाजूने लागल्याने शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा देत आनंद साजरा केला. शिवसेना  नेत्यांनी या निर्णया चे स्वागत केले आहे.  


दरम्यान शिंदे गट या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती आहे.  सर्वोच्च न्यायालयात 27 रोजी याबाबत सुनावणी होणार असल्याचे समजते.त्यावर  शिवसेना नेत्यांनी आमचा न्यायादेवते वर  विश्वास असल्याने तिथेही सत्याचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केला.    आम्ही शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध आहोत मात्र विरोधकांची दादागिरी मुळेच असा प्रश्न निर्माण होऊ शकतो,  असा आरोप केला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या