लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर – गेल्या सात वर्षांपासून नगरमध्ये पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेच्या माध्यमातून चांगल्या विचारांचे चिंतन, मनन आणि मंथन होत आहे. पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेमुळे नगरच्या दर्दी रसिकांना वैचारिक पर्वणी मिळत आहे. नागरिकांनी अशा उपक्रमांना प्रतिसाद देवून लाभ घ्यावा, असे आवाहन युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांनी केले.
पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या व्याख्यानमालेस येत्या २५ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. यानिमित्त व्याख्यानमालेच्या प्रचार पत्रिकेचे अनावरण ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात होऊन विक्रम राठोड यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री गणपती चरणी पत्रिका अर्पण करण्यात आली. यावेळी पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा, व्याख्यानमाला संयोजन समितीचे धनंजय तागडे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, निलेश लोढा, कैलास दळवी, उमेश बोरा, बाळासाहेब भुजबळ, किशोर बोरा, सचिन पारखी, राजकुमार जोशी, कैलास दळवी, बाळासाहेब खताडे, पंकज जहागीरदार, गौतम कराळे आदी उपस्थित होते.
वसंत लोढा म्हणाले, पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेच्या माध्यमातून देशात नावाजलेले दिग्गज वक्ते आपले प्रगल्भ विचार मांडत आहेत. नगरकरांना ही अनोखी वैचारिक मेजवानी देण्याचा आमचा छोटा प्रयत्न आहे. व्याख्यानमालेच्या सातव्या वर्षीहीही परंपरा कायम असून, यावर्षीही देशातील प्रख्यात विचारवंत वक्त्यांची व्याख्यानमालेला उपस्थिती राहणार आहे. नगरच्या श्रोत्यांना पंडित दीनदयाळ व्याख्यानमाला भावली असून, व्याख्यानमालेच्या यशस्वीतेचा आलेख वाढतच आहे. ही व्याख्यानमाला उत्तरोत्तर अशीचयशस्वी होवून बहरत राहो, यासाठी श्री विशाल गणपती चरणी साकडे घातले आहे.
0 टिप्पण्या