Ticker

6/Breaking/ticker-posts

कोर्टात ई चलनद्वारे स्टॅम्प खरेदीसाठी पाठपुरावा : अॅड. नानासाहेब पादीर

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)    

 
नगर - अहमदनगर लॉयर्स को-ऑप सोसायटीची २०२१– २२ ची वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हा न्यायालयात जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्सहात झाली. लॉयर्स सोसायटीचे चेअरमन अॅड.नानासाहेब पादीर, व्हाईस चेअरमन अॅड. प्रभाकर शहाणे, सेक्रेटरी अॅड. रफिक बेग, शहर बार अध्यक्ष अॅड. अनिल सरोदे, सेंट्रल बारचे अध्यक्ष अॅड. किशोर देशपांडे, माजी अध्यक्ष अॅड.भूषण बऱ्हाटे आदिंसह लॉयर्स सोसायटीचे संचालक व वकील सभासद उपस्थित होते. विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर होत साधक बाधक चर्चा होत खेळीमेळीत ही सभा संपन्न झाली.

        यावेळी बोलतांना चेअरमन अॅड. नानासाहेब पादीर म्हणाले, लॉयर्स सोसायटीचे सर्व सभासद वकिलांच्या सहकार्यामुळे उत्कृष्ट काम चालू आहे. करोना संकटातही झालेल्या उत्कृष्ट कामा मुळे लॉयर्स सोसायटीने ऑडिट ‘अ’ वर्ग कायम राखला आहे. सोसायटीच्या कामात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना संस्थेतील कर्मचारी यांना भरघोस वेतन वाढ केली आहे. संस्थेची स्टॅम्प विक्रीची मर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. इ चलन द्वारे स्टॅम्प खरेदी करता यावी यासाठी ही पाठपुरावा करत आहे. यापुढील काळातही लॉयर्स सोसायटीच्या माध्यामातून सभासद वकिलांना जास्तीतजास्त चांगल्या सुविधा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. चालू वर्षी देखील सभासदांना बोनस स्वरूपात अॅडव्होकेट डायरी देणार आहोत.

            
सतीश पाटील म्हणाले, जिल्हा न्यायालयात लॉयर्स सोसायटी महत्वाची भूमिका बजावत आहे. सभासदांचे हित पहात उत्कृष्ट काम करत आहे. विविध सुविधा उपलब्ध करत असल्याने वकिलांना सहकार्य करत आहे, अशा शब्दात कौतुक केले.

            
सभेचे सूत्रसंचालन अॅड. सुधीर टोकेकर यांनी केले. सेक्रेटरी अॅड. रफिक बेग यांनी आभार मानले. यावेळी संचालक अॅड., अॅड.बाळासाहेब गोफणे, अॅड.सुरेश कोहकडे, अॅड.रवींद्र शितोळे, अॅड.अरविंद मुळे, अॅड. स्वाती नगरकर, अॅड.सविता कराळे, अॅड.सुरेश ठोकळ, अॅड.चंद्रकांत शेकडे, अॅड.मंगेश सोले, अॅड. शिवाजीराव अनभुले, अॅड. बी.एस.खांडरे, सदस्य अॅड. लक्ष्मण गोरे,  अॅड. बार्शीकर, अॅड. घुले, अॅड.विनायक कांबळे, अॅड. संकलेचा, अॅड.भोसे, अॅड.बर्डे, अॅड.चंदन बारटक्के, अॅड.संदीप काळे, अॅड.गोत, अॅड.कावरे, अॅड.केतन रोहोकले, व्यवस्थापक अश्विनी पवार, एस.एल.दंडवते, एस.ए.घोलप, ए.ए.मुळे आदि कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या