लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर:- दि. १८ सप्टेंबर
ग्रामसेवकाची कामधेनू असलेल्या अहमदनगर जिल्हा ग्रामसेवकाची सहकारी पतसंस्थेच्यावतीने १ कोटी १० लाख रुपयांचा लाभांश वाटप करण्यात आल्याची माहिती ग्रामसेवकांचे नेते एकनाथराव ढाकणे यांनी दिली.
संस्थेची ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक १७ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता पटेल मंगल कार्यालय टिळक रोड अहमदनगर या ठिकाणी ग्रामसेवकांचे नेते एकनाथराव ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी पुढे बोलताना ढाकणे म्हणाले की, भविष्यात सुद्धा सभासदांचा विश्वास सार्थक करण्यासाठी अनेक कल्याणकारी योजनांची अमालबजवणी करण्यात येईल. .आपण सभासदांना 2️⃣5️⃣ लाख रुपये कर्ज देत असून चांगली बाब आहे ऑडिट वर्ग अ आहे. सर्व कामकाज ऑनलाइन आहे. तसेच मयत सभासदांना कर्जमाफी योजना लागू आहे. अपघाती विमा संरक्षण 1️⃣5️⃣लाख रुपये अतिरिक्त तरतूद आहे. स्व मालकीची तीन मजली संस्थेची इमारत आहे. पतसंस्था आणि संघटनेत समन्वय भूमिका आहे. ग्रामसेवक मार्गदर्शन केंद्र कार्यान्वित आहे. एकमुखी नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची यशस्वी वाटचाल चालू असून पुढील कालखंडामध्ये लवकरच पंचवार्षिक निवडणूक होत आहे. संस्थेची मागील परंपरा यापुढे सुद्धा कायम राहावी, व बिनविरोध निवडणूक व्हावी, असे आवाहन सभासदांना ढाकणे यांनी केले. त्यास सभासदांनी टाळ्याच्या गजरात प्रतिसाद दिला.
या सभेत दिवंगत सभासदांना आदरांजली अर्पण करून दीप प्रज्वलनाने सभेला सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी दहावी,बारावी आणि विशेष पदवी परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या आणि ग्रामसेवकांचे पाल्य वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश केलेल्या एकूण ७० विद्यार्थी पाल्य यांचा या ठिकाणी गुणगौरव करण्यात आला.त्याचबरोबर १२ सेवानिवृत्त ग्रामसेवक सभासदांचा सन्मान करण्यात आला. माजी वसुंधरा अभियान-2 मध्ये जिल्ह्यातील पाचपंचायतींनी राज्यस्तरावर यशस्वी कामगिरी केल्याबद्दल वाघोली, तालुका शेवगाव ,गणोरे तालुका अकोले ,मढी तालुका पाथर्डी,मिरजगाव तालुका कर्जत,सोनई तालुका नेवासा येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
राज्यस्तरीय जि. प. आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त सविता गर्जे, डॉ. प्रवीण कडणेलांडगे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्काराबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. आदर्श तालुकाध्यक्ष आणि तालुका सचिव गोरख शेळके, नारायण खेडकर,किसन भिंगारदे, रामदास कार्ले,राजीव गायकवाड आणि सतीश मोटे यांचा सत्कार केला. तसेच यावेळी अतुल्य योगदानाबद्दल ग्रामसेवकांचे नेते एकनाथराव ढाकणे, प्रशांत जामोदे यांचा जिल्ह्याच्या वतीने गौरव करण्यात आला.
संगमनेर तालुका ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पावशे यांची राज्य संघटनेच्या विभागीय सहसचिवपदी निवड झाल्याबद्दल, नूतन राज्य कार्यकारणी अध्यक्ष सचिव आणि सर्व टीमचा बिनविरोध निवडीबद्दल अभिनंदन याचा ठराव संमत करण्यात आला.
सभेचे सूत्रसंचालन आणि प्रस्ताविक पतसंस्थेचे चेअरमन विजयकुमार बनाते आणि शितलताई पेरणी सेक्रेटरी प्रदीप कल्याणकर, नाफिस खान पठाण यांनी केले. आभार संचालक सुनील नागरे यांनी मानले.
0 टिप्पण्या