Ticker

6/Breaking/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराजांची कथा ही राम कथेचीच पुनरावृत्ती : स्वामी गोविंददेव गिरी महाराज

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)  

नगर – नगर जिल्ह्याने मला घडवले आहे. अगस्त्यांच राष्ट्रभक्ती पूर्ण जीवन असलेल्या अकोला व ज्ञानेश्वरांचे वात्सल्य प्रेमभाव जिव्हाळा असलेल्या नेवासा या दोन्ही गावांमध्ये मध्ये असल्याने बेलापूर मध्ये माझे बालपण गेले आहे. म्हणूनच माझ्याकडून हे राम मंदिराबरोबर अनेक महान कार्य होत आहे. राम कथा ही राष्ट्राच्या उद्धाराची कथा आहे. जर ही रामकथा जवळून बघायची असेल तर दूर जायला नको. ३०० वर्षांपूर्वीची छत्रपती शिवाजी महाराजांची जी कथा आहे, असे सांगून आनंदोत्सव ट्रस्टने देलेला पुरस्कार हे माझे भूषण व भाग्य समजतो, असे प्रतिपादन स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी केले


आध्यात्मिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या नगरच्या आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा 'जीवन गौरव पुरस्कार' नगरचे भूमिपुत्र व अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष व मथुराच्या श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष विद्यावाचस्पती स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांना भक्तिपूर्ण व भारावलेल्या समारंभात प्रदान करण्यात आला. महावस्त्र, पूर्ण पोशाख, गौरवनिधी, चरण पादुका, स्मृतीचिन्ह, मानपत्र व ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. 


महंत भास्करगिरी महाराज, प्रज्ञाचक्षू मुकुंदकाका जाटदेवळेकर, विद्यावाचस्पती ह.भ.प. डॉ. रामकृष्णदास लहवितकर महाराज, महंत ह.भ.प. रामगिरी महाराज, संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचे दहावे वंशज ह.भ.प. शिवाजीराव मोरे महाराज, संत समर्थ रामदास स्वामींचे ११ वे वंशज महंत भूषण स्वामी रामदासी व बालयोगी श्री सदानंद महाराज आदी संत विभूतींच्या शुभहस्ते हा पुरस्कार स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना देण्यात आला. 


यावेळी गीता परिवाराचे कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रा.प्रकाश सोमण, मोरया प्रकाशाचे दिलीप महाजन, आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अनिल सहस्रबुद्धे, विश्वस्त सौ.उषा सहस्रबुद्धे, समारंभाचे स्वागताध्यक्ष अॅड.के.डी.धुमाळ आदींसह अनेक धर्माचार्य व्यासपीठावर उपस्थित होते. मोठ्या संख्यने नागरिक या सोहळ्यास उपस्थित होते.


           


.


             

             .


            


 

  टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या