Ticker

6/Breaking/ticker-posts

बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी मंदिरात तुळजापुर पालखीचे उत्साहात स्वागतदोन वर्षांनी बुऱ्हाणनगरमध्ये भरली यात्रा




















लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


नगर – नवरात्र उत्सवा निमित्त बुऱ्हानगर ( ता. नगर ) येथे तीसऱ्या माळेला तुळजापुरच्या पालखीचे आगमन झाले. सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी सपत्नीक पालखीची आरती व महापुजा केली. यावेळी मंदिराचे पुजारी अॅड. विजय भगत, अॅड. अभिषेक भगत, अमोल जाधव, रोहीदास कर्डिले, देविदास कर्डिले, राजेंद्र भगत, किरण भगत, सुभाष भगत आदींनी पालखीचे स्वागत केले. दुपारी बारा वाजता तुळजापुरच्या पालखीची वाजत गाजत गावातून मिरवणुक काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

 देवीच्या पलंगाची व पालखीची भेट याठिकाणी झाली. गावत पालखीचे स्वागत करण्यासाठी महिलांनी घरासमोर आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या. घरोघरी पालखीची पूजा करण्यात आली. यावेळी पोलीस बंदोबस्त मोठया प्रमाणात तैनात होता. देवीच्या व पालखीच्या दर्शनासाठी माहिला व पुरुष भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव म्हणाले, दोन वर्षांनी यंदा उत्सहात नवरात्रोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होत आहे. यानिमित्त सर्वत्र भक्तिपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. तुळजापूरच्या देवीचे माहेर असलेल्या बुऱ्हाणनगर मध्ये पालखीचे आगमन झाल्यावर येथील भगत कुटुंबीयांनी मोठ्या भक्तिभावाने या पालखीचे स्वागत केले आहे. या पालखीची आरती करण्याचा संधी आज मिळाल्याने मी भाग्यवान आहे.

            पुजारी अॅड. अभिषेक भगत म्हणाले, तुळजापूरच्या पालखीचा मान एक हजाराहून अधिक वर्षांपासून बुऱ्हाणनगरच्या भगत कुटुंबीयांकडे आहे. विजया दशमीला तुळजाभवानीच्या सिमोलान्घानासाठी नगरमधून दरवर्षी ही पालखी जात असते. आज तिसऱ्या माळेच्या उत्सवाला संपूर्ण राज्यातून मोठ्याप्रमाणात भाविक येथे आले आहेत. सर्व भाविकांची मनोकामना पूर्ण करणारी ही देवी आहे. देवीच्या आशीर्वादाने सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.

सौ.दुर्गा भगत, अंजली भगत, सुनंदा भगत, मनीषा भगत¸ कविता भगत¸ अंकिता भगत¸ पूजा भगत, अजिंक्य भगत, कुणाल भगत, रोहन भगत, संकेत भगत, वेद भगत, अजिनाथ कडीले, अनिल गुंजाळ, राजेंद्र कर्डीले आदी यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या