Ticker

6/Breaking/ticker-posts

खळबळजनक : खरवंडी कासार येथे दरोडा: ९ लाखाचा ऐवज लंपास ; ग्रामस्थामध्ये प्रचंड घबराट..!

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)    

खरवंडी कासार ( ता. पाथर्डी):-

खरवंडी कासार  येथील बंद घरात मागील बाजुची खिडकी तोडुन घरात प्रवेश करुन अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागीने असा ९ लाख ४८ हजार रुपयाचा ऐवज चोरुन नेला. 


याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर अर्जुन आव्हाड यांनी पोलिसात फिर्य़ाद दिली आहे. नगरच खरवंडी येथे ज्ञानेश्वर अर्जुन आव्हाड राहतात. ते व कुटुंबातील इतर दस्य समोरच्या खोलीमधे झोपले होते. घराच्या मागील बाजुची खिडकी तोडुन चोरटे घरात आले. त्यांनी कपाटातील एक लाख अठ्टावीस हजार रुपयाची रोकड व सोन्याचे दागीने असा नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयाचा ऐवज  चोरुन पोबारा केला . रात्री दहा वाजल्यापासुन ते पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आव्हाड पहाटे उठल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले.


नगरच्या स्थानिक गुन्हेशाखेचे अधिकारी व कर्मचारी खरवंडीत दाखल झाले आहेत. श्वानपथक, ठसेतज्ञ यांना बोलविण्यात आले होते.  तसेच पाथर्डीचे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील कर्मचा-यासह घटना स्थळाला भेट देवुन आले.  स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पाथर्डीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील अधिक तपास करीत आहेत.   या दरोड्यामुळे  एकच खळबळ उडाली असून खरवंडी गावात भितीचे वातावरण पसरले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या