Ticker

6/Breaking/ticker-posts

परस्पर कारवाईचे बालंट महसूल लिपिकाच्या अंगलट ; डंपर चालकाने एवढे धू-धू धुतले..की सरकारी बाबुला झाली पळता भुई थोडी..!

      


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)      

   शेवगाव :  शेवगाव तालुक्यातील क-हेटाकळी - खानापूर परिसरात रस्त्याच्या कामासाठी खडीची वाहतुक करणा-या डंपर चालकाकडे कारवाई टाळण्यासाठी अनधिकृतपणे पैशाची मागणी करणा-या शेवगाव तहसील कार्यालयातील एका वजनदार लिपीकास डंपर चालक व त्याच्या साथीदाराने चांगलाच चोप दिला. वरिष्ठांचे कुठलेही आदेश नसतांना कारवाईसाठी गेलेल्या लिपीकास हे धाडस चांगलेच महागात पडले असून धू-धू धुतल्यानंतर त्याला पळता भुई थोडी झाली.

      याबाबत समजलेले विश्वसनीय वृत्त असे की, पैठण रस्त्यावरील क-हेटाकळी-खानापूर शिवारात सुरु असलेल्या एका रस्त्याच्या कामावर बुधवारी (दि.२१) सायंकाळी शेवगाव तहसील कार्यालयातील एक लिपीक स्वत:च्या खाजगी वाहनातून वरिष्ठांचे आदेश नसतांना गेला.खडी वाहतुक कऱणा-या डंपर चालक व संबंधीत व्यक्तीकडे त्याने कारवाई टाळण्यासाठी काही रक्कमेची मागणी केली. संबंधीतांनी त्यास होकार देत त्याचे मोबाईलमध्ये शुटींग केले,त्यानंतर त्यास तेथे चांगला चोप दिला.सायंकाळी घडलेला हा प्रकार पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होताच त्याला नजीकच्या एका फार्महाऊसवर उचलून नेऊन पुन्हा धुलाई केली. तेथून त्याने आपली कसीबसी  सुटका करुन शेवगाव गाठले. मात्र, याबाबत ' तेरी भी चूप, मेरी भी चुप ' या न्यायाने दोघांनीही तक्रार दाखल करण्याचे टाळले. मारझोडीची ही वार्ता शेवगावमध्ये वाऱ्यासारखी पसरली. विशेषतः शेवगाव तहसील कार्यालयात या मारझोडीबाबत खमंग चर्चा सुरू आहे.

       संबंधित मूजोर लिपिक अनेक वर्षापासून शेवगाव तहसील कार्यालयात ठाण मांडून आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन संभाषण लोकेशन तपासल्यास अनेक भानगडी समोर येतील, हे वास्तव आहे.सध्याचे तहसीलदार छगन वाघ यांचे कार्यालयातील कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही. त्यामुळे दोन-तीन महिन्यापासून शेवगावचे तहसील कार्यालय या- ना त्या कारणाने सतत चर्चेत राहिले किंबहुना,तीन महिन्यात दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले. त्यामुळे तहसील कार्यालयाची अब्रू वेशीवर आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या