Ticker

6/Breaking/ticker-posts

चंदनापुरीच्या जुन्याघाटात चार लूटा रुंनी पुण्याच्या व्यावसायिकाला लुटले

 




लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


संगमनेर :

     पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या सुवर्णा अलंकाराच्या प्रदर्शनाच्या कार्यक्र माचे संगमनेरातील सुवर्णकारांना निमंत्रण देण्यासाठी पुण्याहून संगमनेरला येणार्‍या एका तरुण व्यावसायिकाची दिशाभूल करुन त्याला चंदनापुरीच्या जुन्या घाटाने पाठविले आणि पुढे येताच चौघांनी त्यास चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील सोन्याचांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम असा साडे आठरा हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे फरार झाले.

 याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून समजलेले अधिक माहिती अशी की, पुणे येथील कासारवाडीत (भोसरी) राहणारा प्रिंस ललीत शर्मा हा बावीस वर्षीय तरुण व्यावसायिक पुण्यात आयोजित करण्यात येणाऱ्या सुवर्ण अलंकारांच्या प्रदर्शनाचे निमंत्रण संगमनेर शहरातील सुवर्णकारांना देण्यासाठी आपल्या दुचाकीवरुन पुण्या हून संगमनेरच्या दिशेने येत होता . बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तो चंदनापुरी घाटातील गुंजाळ यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाजवळ पोहोचला असता रस्त्यावर उभ्या असलेल्या एका अनोळखी इसमाने त्याला थांबवत पुढे वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे त्यामुळे तुम्ही जुन्या मार्गाने जा..! असे सांगितले

        अनोळखी इसमावरती विश्वास ठेवून त्या तरुण व्यावसायिकाने आपली दुचाकी जुन्या घाटाने घेतली. अन तो गणपती मंदिराजवळ आधीपासूनच थांबलेल्या चौघांनी त्याला थांबवले. आणि त्यातील एकाने शर्मा यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील चांदीची साखळी, हातातील चांदीचे कडे, रेडमी कंपनीचा मोबाईल आणि पाकीटातील दीड हजार रुपयांची रोकड असा एकूण १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला आणि ते चौघेही अज्ञात चोरटे पल्सर व पांढर्‍या रंगाच्या एक्टिव्हा दुचाकीवरुन पसार झाले.

       या घडल्या प्रकाराची माहिती प्रिन्स शर्मा संगमनेर तालुका पोलिसांना कळ विली माहिती मिळताच संगमनेर उपवि भागाचे पोलीस अधीक्षक राहुल मदने, प्रभारी निरीक्षक सुनील पाटील व पोलीस उपनिरीक्षक ईस्माइल शेख यांनी तत्काळ चंदनापुरी घाटात धाव घेत आसपासचा परिसर पिंजून काढला, मात्र त्यांना चोर ट्यांचा मागमूस काढता आला नाही. 


याबाबत पी शर्मा यांनी संगमनेर तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलि सांनी अज्ञात चार चोरट्यांच्या विरुद्ध रॉबरीचा गुन्हा दाखल केला आहे याबाब तचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ईस्माइल शेख  हे करत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या