Ticker

6/Breaking/ticker-posts

महिला सक्षमीकरणांवर शालेय मुलांची ‘जनजागृती रॅली’ ; जिल्हा ग्रंथालय कार्यालयाचा उपक्रम

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर, दि.१९ सप्टेंबर

आधुनिकचे जनक राजाराम मोहनरॉय यांच्या २५० व्या जयंती निमित्ताने गुरूवारी, दि. २२ सप्टेंबर रोजी ‘महिला सक्षमीकरणावर’ शालेय मुलांची जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे.  अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी  दिली आहे.


जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने कोलकाताच्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानांच्या अर्थसहाय्यातून राज्यातील १६ जिल्हयात जनजागृतीपर रॅली काढण्यात येणार आहे.  विविध शाळा व महाविद्यालयातील २५० विद्यार्थी- विद्यार्थीनी रॅलीत सहभागी होणार आहेत. उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक (हुतात्मा स्मारक ) येथे सकाळी ८ वाजता होणार आहे. 


या रॅलीचा मार्ग- हुतात्मा स्मारक -निलक्रांती चौक- सिध्दीबाग परिसर बालिकाश्रम रोड भुतकरवाडी- महालक्ष्मी उद्यान (जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय) असा आहे.


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा  परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, राज्याच्या प्रभारी ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले, जिल्हा कोषागार अधिकारी भाग्यश्री जाधव-भोसले, शिक्षण अधिकारी अशोक कडुस, भास्कर पाटील, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.रवींद्र ठाकुर, जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानचे क्षेत्रिय अधिकारी अनंत वाघ, नाशिक विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे उपस्थित राहणार आहे. अशी माहिती ही  गाडेकर यांनी  दिली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या