Ticker

6/Breaking/ticker-posts

पं. दीनदयाळ व्याख्यानमालेचे २४ ते २६ सप्टेंबर दरम्यान आयोजन; दिग्गजांची नगरकरांना मिळणार वैचारीक मेजवानी..! - वसंत लोढा
 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर - दि.२० सप्टेंबर २२

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी जीवनभर सर्वसामान्य तळागाळातील नागरिकांकरीता काम केले. त्यांच्याच विचाराने प्रेरित होवून गेल्या ३१ वर्षांपासून नगरची पंडित दीनदयाळ पतसंस्था सहकार क्षेत्रात काम करत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह अर्थसेवा देत सामाजिक जाणीवेतून विविध उपक्रमांवरही भर देत आहे. या अंतर्गत २०१६ पासून शहरात वैचारिक मंथन व्हावे यासाठी पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेचे आयोजन पतसंस्था करत आहे. या आधी झालेल्या सर्व व्याख्यानमालांना नगरमधील रसिक श्रोत्यांचा उत्स्फुर्त मोठा प्रतिसादा मुळे यशस्वी झाल्या आहेत. यावर्षी होणाऱ्या सातव्या पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेचे आयोजन दि. २४ ते २६ सप्टेंबर या तीन दिवसात करण्यात आले आहे, अशी माहिती पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांनी दिली.


सावेडी येथील झोपडी कॅन्टीन जवळील माऊली सभागृहात ही व्याख्यानमाला होणार आहे. करोना संकटामुळे दोन वर्षाच्या खंडा नंतर होणाऱ्या यावर्षीच्या व्याख्यानमालेची व्याप्ती वाढवली असून राष्ट्रीय स्तरावरील अनेक दिग्गज विचारवंतांची व्याख्याने ऐकण्याची मेजवानी नगरकरांना मिळणार आहे, 


  व्याख्यानमालेबद्दल अधिक माहिती देतांना व्याख्यानमालेचे संयोजन समितीचे धनंजय तागडे यांनी सांगितले, पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेचा शुभारंभ शनिवार दि. २४ सप्टेंबर रोजी सायं. ६ वा.राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प दिल्ली येथील इंडियन स्टार्टअप योजनेचे तज्ज्ञ ऋषी भटनागर हे गुंफणार असून त्यांचे ‘लघु व मध्यम उद्दोजकता विकास भवितव्य’ या विषयावर व्याख्यान होईल. रविवार दि.२५ रोजी सायं.६ वा. भाजपचे दिल्ली येथील राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा यांचे ‘भारत देश का भवितव्य एवं चुनौतिया’ या विषयावर द्वितीय पुष्प होईल. यावेळी प्रमुख पाहुणे भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांचे ‘वर्तमान भारत दशा व दिशा’ या विषयावर व्याख्यान होईल. यावेळी आ.राम शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सोमवार दि.२६ सप्टेंबर रोजी सायं. 6 वा.केरळ राज्याचे राज्यपाल आरिफ खान यांचे ‘समान नागरी कायदा या विषयावर’ तृतीय व अंतिम पुष्प होईल. यावेळी उद्योजक व तिरुपती बालाजी देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.


भारतीय समाज व्यवस्था, सेवा, संस्कृती आणि राजकारण, समाजकारणाची जडण-घडण ज्या निवडक व्यक्तींमुळे चिरकालासाठी शाश्वत घडली, त्यापैकी एक अग्रगण्य आणि अद्वैत असं बहुआयामी असलेले व प्रसिद्धी विन्मुख व्यक्तीमत्व म्हणजे पंडित दीनयाळ उपाध्याय होय.   नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपाध्यक्ष गौतम दीक्षित ,सचिव विकास पाथरकर , व्याख्यानमाला समितीचे कार्यवाह सुहास मुळे ,संचालक सुधीर पगारिया, भैय्या गंधे, विक्रम राठोड, दिलीप सातपुते, प्रा.सुनील पंडित, बाळासाहेब भुजबळ, बाबासाहेब वाकळे, गौतम कराळे, विवेक नाईक, नरेंद्र श्रोत्री, महेश नामदे, तुषार पोटे, सोमनाथ चिंतामणी, बाबासाहेब सानप, व्यवस्थापक निलेश लाटे, उपव्यवस्थापक सुखदेव दरेकर आदींनी केले आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या