सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार–२०२२ स्पर्धेचे आयोजन
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर-
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे "स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी, आली बाप्पाची स्वारी आदर्श मंडळ होण्यासाठी, करूया जय्यत तयारी" यावर आधारित सार्वजनिक गणेश मंडळांसाठी उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार-२०२२ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धक गणेश मंडळांना प्रथम क्रमांकासाठी पाच लाख रुपयांचे राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी दोन लाख पन्नास हजार रुपयांचे आणि तृतीय क्रमांकाचे एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाच्या गणेशोत्सव मंडळास पंचवीस हजार रुपयांची एकूण तेहेतीस पारितोषिक देण्यात येणार आहेत.
सविस्तर माहिती व अर्जाचा नमुना www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०२२ आहे.
गणेश मंडळांनी आपले अर्ज mahotsav.plda@gmail.com या मेलवर दाखल करावे. अधिक माहितीसाठी शुभंकर, मोबाईल क्रमांक ९८३३२२५४०२ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.
0 टिप्पण्या