Ticker

6/Breaking/ticker-posts

आई वडीलांबद्दल आदरभाव ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य -डॉ. विठ्ठल लहाने
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नगर- सध्याची पिढी आई वडिलांना विसरत चालली आहे, ज्यांच्यामुळे आपल्याला हे जग पहायला मिळाले, त्यांच्याबद्दल मनात आदरभाव असणे गरजेचे आहे.पृथ्वीवरचा स्वर्ग हा कुटुंबातच असतो तो आनंद प्रत्येकाला घेता आला पाहिजे असे मत प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ विठ्ठल लहाने यांनी व्यक्त केले.


वै.सौ. जिजाबाई बाबुराव साळुंके यांच्या बाराव्या स्मृतीदिनी मातृगौरव सोहळ्याच्या निमित्ताने सौ.आनंदीबाई देवराम ठुबे (कान्हूरपठार,ता. पारनेर)सौ.निर्मला सुभाष जाधव(लोणी खुर्द,ता. राहता)श्रीमती अंजनाबाई पुंडलिकराव लहाने(माकेगाव,जि.लातूर)या आदर्श मातांचा डॉ विठ्ठल लहाने यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.


याप्रसंगी आमदार संग्राम जगताप, आमदार निलेश लंके, पुंडलिक महाराज जंगले शास्त्री, उपमहापौर गणेश भोसले,प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, जि.प.उपाध्यक्ष प्रताप शेळके, मा जि.प. उपाध्यक्ष सुजित झावरे, बाबूराव साळुंके, अनिल साळुंके, अशोक साळुंके, अरूण साळुंके, अविनाश साळुंके, अशोक बाबर, बापूसाहेब भोसले, अड. विजयराव काकडे, ऍड. युवराज काकडे, अभिजित काकडे, विशाल झावरे आदींसह मोठ्या संख्नेने नागरिक उपस्थित होते.


 डॉ विठ्ठल लहाने पुढे म्हणाले शब्दांचा योग्य वापर केला की नाती आयुष्यभर टिकून राहतात. आपल्यासाठी ज्यांनी आयुष्यभर संघर्ष केला त्या मातेचे ऋण कधीच विसरू नये.जुन्या पिढीने घालून दिलेले संस्कार जतन करायला हवेत.आई ही उन्हाची सावली असून आयुष्यभर तिच्या ऋणात राहणे हेच आपले कर्तव्य आहे. आई खऱ्या अर्थाने पिढी घडविते,आदर्श संस्कार देते आईला विसरू नका आई वडिलांना वृध्दाश्रमात पाठवायचे पाप करू नका. म्हातारपणी त्यांचा आधार बना असे ते म्हणाले.


 कार्क्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन व जिजाबाईच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर ओमशांतीच्या लक्ष्मी दीदी यांचे प्रवचन झाले ,प्रास्ताविक अशोक साळुंके यांनी केले. तसेच रोहित साळुंके व अनिल साळुंके यांनी कार्यक्रमाविषयी मनोगत व्यक्त केले.तर आभार चि.रूपेश साळुंके यांनी मानले.सूत्रसंचलन अरूण साळुंके यांनी केले.


           

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या