Ticker

6/Breaking/ticker-posts

दहिगाव-नेत बैलपोळा उत्साहात ;मा.आमदार चंद्रशेखर घुले व राजश्रीताई घुले यांनी सर्जा - राजाला भरवला पुरणपोळीचा घास

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क 

 शेवगाव : नगर जिल्ह्यातील दहिगाव -ने येथे बैलपोळा सण पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. राजश्री घुले पाटील यांनी सर्जा - राजाचे औक्षण करून पुरणपोळीचा घास भरवला. यावेळी माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

      घुले बंधू नगरला स्थायिक असले, तरी ते प्रत्येक सणवार आपल्या कुटुंबीयांसमवेत दहिगाव ने येथे साजरा करतात.बैलपोळा सणाच्या निमित्ताने विविध देव- दैवतांबरोबरच काळ्या आईला श्रीफळ वाढवून नैवेद्य दाखवतात. घुले दाम्पत्याने सायंकाळी सर्जा - राजाचे औक्षण करून त्यांना पुरणपोळीचा घास भरवला.        सातत्याने बळीराजाचे प्रश्न सोडवण्यासाठी संवेदनशील असलेले घुले कुटुंब पोळा सणाच्या निमित्ताने दहिगावनेच्या वाड्यावर एकत्र आले.दिवंगत ज्येष्ठ लोकनेते मारुतराव घुले पाटील यांचा वसा व वारसा ते नेटाने पुढे चालवत असल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या