Ticker

6/Breaking/ticker-posts

तपोवन रोडवर संत वामनभाऊ,विठ्ठल-रुक्मिणी मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

 दि. 19 ते  21 सलग तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नगर - तपोवन रोडवरील वामनभाऊनगर-साईनगर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात संत वामनभाऊ , श्री विठ्ठल-रुक्मिणी व गणेशाच्या  मूर्तींची प्राण प्रतिष्ठापणा गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या हस्ते  करण्यात येत आहे. 


या  सोहळ्यात शुक्रवारपासून (दि. 19) ते रविवार (दि. 21) यादरम्यान तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात आले आहे.  तपोवन रोडवरील वामनभाऊनगर- साईनगर येथे  परिसरातील तरुणांनी एकत्र  येऊन  सुमारे  15 लाख  रुपये  खर्चाचे भव्य असे श्री संत वामनभाऊ मंदिर उभारले आहे. या मंदिरात संत वामनभाऊ विठ्ठल-रुक्मिणी व  गणेश मूर्तीचि प्रतिष्ठापणा होईल.  यानिमित्त कलशाची सवाद्य मिरवणूक ह.भ.प. राम महाराज घुले यांच्या उपस्थितीत शुक्रवार, दि. 19 रोजी सायंकाळी पाच वाजता निघेल. 


शनिवार दि. 20 रोजी श्रीराम साधना आश्रम (रामनगर,नेवासा फाटा) येथील महंत सुनीलगिरी महाराज यांचे सायंकाळी सहा ते आठ या वेळेत प्रवचन होईल. रविवार दि. 21 रोजी श्रीक्षेत्र अंजनीगड (डोंगरवाडी) येथील महंत लक्ष्मण महाराज कराड यांचे सकाळी नऊ ते अकरा या वेळेत काल्याचे कीर्तन होणार आहे. 


तसेच दुपारी बारा वाजता श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे (चिंचोली) महंत विठ्ठल महाराज शास्त्री वश्री क्षेत्र तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या हस्ते माल्यार्पण व मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येईल.

या  कार्यक्रमास माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, खासदार सुजय विखे, आमदार संग्राम जगताप,  बु-हाणनगरचे सरपंच रावसाहेब कर्डिले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्या नंतर अन्नदाते डाॅ. प्रमोद आव्हाड यांच्या सहकार्याने महाप्रसाद होईल. 


या कार्यक्रमास पै. अक्षयदादा कर्डिले मित्रमंडळ, संत भगवानबाबा प्रतिष्ठान (भगवानबाबा चौक, निर्मलनगर) राज गृप- अहमदनगर, मृत्युंजय प्रतिष्ठान, जयहिंद सैनिक सेवा फाऊंडेशन, शिवराजे रूद्र युवा प्रतिष्ठान सूर्यनगर, तपोवनाचा राजा मित्रमंडळ (तपोवन रोड), छत्रपती शिवाजी महाराज ग्रूप, जय भगवानबाबा युवा प्रतिष्ठान (सारसनगर) यांचे सहकार्य लाभले आहे. मंदिर, मूर्ती आदींसाठी दानशूर  नागरिकांचे सहकार्य लाभले असून  आणखीही भाविकांनी स्वेच्छेने देणगी द्यावी,  असे  आवाहन करण्यात आले आहे. 

या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन वामनभाऊ प्रतिष्ठान, समस्त ग्रामस्थ मंडळी बुऱ्हाणनगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या