Ticker

6/Breaking/ticker-posts

धार्मिक स्थळांमुळे सामाजिक ऐक्य साधते : शिवाजीराव कर्डिले

 तपोवन रोडवर संत वामनभाऊ, विठ्ठल रुक्मिणी  मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न 

 


  सोहळ्यात बोलताना मा. मंत्री शिवाजीराव कर्डिले व्यासपीठावर  गहिनीनाथ गडाचे महंत  ह. भ. प. विठ्ठल  महाराज शास्त्री, अंजनि गडाचे  महंत  ह. भ. प.   लक्ष्मण महाराज कराड,  ह. भ. प. राम  घुले महाराज, श्रीमती सरोज गांधी, बुऱ्हाणनगरचे सरपंच रावसाहेब कर्डिले, वृक्षमित्र शिवाजी पालवे  आदी ( छाया: दिगंबर कुटे, नगर)

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नगर :- सावेडी उपनगराचा  वेगाने विकास व विस्तार होत असताना नागरिकांना मुलभूत सोई-सुविधा पुरविण्याबरोबरच  सामाजिक  ऐक्य घडवून आणण्याचे काम धार्मिक  स्थळांमुळे  होते, त्यासाठी संत वामनभाऊ , गणपती ,विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले. 


तपोवन रोडवरील बुऱ्हाणनगर ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात आलेल्या वामनभाऊ मंदिर  लोकार्पण सोहळ्यात कर्डिले बोलत होते.  व्यासपीठावर  गहिनीनाथ गडाचे महंत  ह. भ. प. विठ्ठल  महाराज शास्त्री, अंजनि गडाचे  महंत ह. भ. प.   लक्ष्मण महाराज कराड,  ह. भ. प. राम  घुले महाराज, श्रीमती सरोज गांधी, बुऱ्हाणनगरचे सरपंच रावसाहेब कर्डिले, वृक्षमित्र शिवाजी पालवे आदी उपस्थित होते. 


पुढे बोलताना शिवाजीराव कर्डिले म्हणाले की,  वर्षभरापुर्वी या परिसरातील कार्यकर्ते व  नागरिकांच्या मागणीनुसार सर्वांशी  चर्चा करून या  मंदिरासाठी आम्ही ग्राम पंचायतीच्या  माध्यामातून जागा उपलब्ध करून देत पायाभरणी केली.  तरुणांनी  एका वर्षात भव्य -दिव्य मंदिर उभारल्याचे समाधान आहे.  आता पुढील वर्षभरातच आपण भव्य सभामंडप उभारू अशी घोषणा केली.  संत वामनभाऊंची शिकवण जाती- पाती विरहित सर्वधर्म समभावाची असल्याने येथे  सार्वजनिक गणेशोत्सव, भजन , कीर्तन आदी विविध धार्मिक-सामाजिक कार्यक्रमांसाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे . या  माध्यमातून सामाजिक  ऐक्य  साधले जाईल, असा विश्‍वास व्यक्त केला.


यावेळी मार्गदर्शन करताना ह. भ. प. विठ्ठल  महाराज शास्त्री यांनी वारकरी संप्रदायाचे मुळ हे गहिनीनाथ महाराज असून त्यांनी निवृत्तीनाथांना सर्व प्रथम अनुग्रह दिला. निवृत्तीनाथांनी  संत ज्ञानेश्वर   माउलींना दिला. तेथून पुढे  वारकरी संप्रदायाचि परंपरा चालत आली. त्याच गहिनीनाथांनी संत  वामनभाऊंना दृष्टांतातूंन अनुग्रह दिला. असे  सांगून अध्यात्म हे मिरवण्याचे साधन नसून स्वअनुभवाचे साध्य आहे, याचे दाखले दिले. तसेच वामनभाऊंचे महात्म्य जाज्वल्य असल्याने पावित्र्य राखावे असे सांगुन मंदिर उभारणीत योगदान दिलेल्या तरुण,  नागरिकांचे  कौतुक केले. सकाळी  11.30 वाजता विठ्ठल महाराजांचे मिरवणुकीने  फटाक्यांच्या  आतषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले.  त्यांच्या हस्ते धार्मिक विधी होऊन मंत्रोच्चारात संत वामनभाऊ,  विठ्ठल रुक्मिणी  व गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा  करण्यात आली. यावेळी आमदार  संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिर कोनशिला अनावरण करण्यात आले.


सकाळी  ह. भ. प.   महाराज कराड यांचे  काल्याचे कीर्तन होऊन  महाप्रसादाने सांगता  झाली.    वामनभाऊ प्रतिष्ठानचे पदाधिकार्‍यांनी  विशेष परिश्रम घेतले.सोहोळ्यास नगरसेवक सुनील त्रिंबके , निखिल  वारे,  बाळासाहेब पवार, उद्योजक राजेंद्र बुधवंत, विठ्ठलराव वायभासे, बाबासाहेब  सानप, विजय गोलहार,  राहुल सांगळे, डॉ. प्रमोद आव्हाड, आदींसह हजारो महिला नागरीक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या