Ticker

6/Breaking/ticker-posts

गुरु-शिष्य परंपरेचा अथांग सागर :प. पू. दादाजी वैशंपायन !





 





  गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरा 

   गुरु साक्षात परब्रम्ह, तस्मै श्री गुरवे नमः


 (गुरुपौर्णिमा विशेष : जगन्नाथ गोसावी)

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 आज गुरुपौर्णिमा. भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदुस्थानाला महर्षी व्यासापासून गुरुपूजनाची गौरवशाली परंपरा लाभलेली आहे. आजच्या शुभदिनी कल्याण (जि. ठाणे) चे रहिवासी व शेवगावच्या दत्तभूमीचे शिल्पकार, अष्टांग योगतज्ञ परमपूज्य दादाजी वैशंपायन या सिद्ध सत्पुरुषाच्या अलौकिक कार्याचा हा अल्पसा परिचय...




    योगतज्ज्ज्ञ प. पू. दादाजी वैशंपायन हे संसारी सिद्ध सत्पुरुष होते. देवभूमी हिमालयात हिंस्र श्वापदाच्या सानिध्यात त्यांनी अत्यंत खडतर व कष्टप्रद मानवी देहाला न झेपणारी अशी उग्र साधना केली. अष्टसिद्धी प्राप्त असलेल्या दादाजींचे अवघे जीवनच अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी समर्पित होते. भूतलावरील इहलोकीची यात्रा संपवून देवलोकी असलेले दादाजी आजही श्रद्धावान साधक - भक्तांना स्वप्नदर्शन देत असल्याची उदाहरणे आहेत.










गुरुमाऊली दादाजींची दत्त सांप्रदायिक साधकांवर खास माया होती. प्रेम,आपुलकी, जिव्हाळा व वासल्याचा ते खळखळता झरा होते. त्यांचा अनुग्रह, सहवास लाभलेले निष्ठावान ज्येष्ठ साधक साक्षात्कारी भक्तीरसात चिंब होत. दादाजींना ' लक्ष्मी पुरुषोत्तम ' ही साक्षात परमेश्वराकडून मिळालेली दुर्लभ देणगी होय. समाजातील दिन दुबळे, व्याधीग्रस्त, दुःखी, निराश्रीत तसेच अंध, अपंगाचे ते तारणहार होते.

      त्यांच्या हयातीत शेवगावमध्ये विशाल औदुंबराखाली उभे राहिलेले दत्त मंदिर आध्यात्मिक केंद्र म्हणून नावारुपास आले असून साधक समूह व दत्तभक्तांचे ते ऊर्जास्रोत बनले आहे. आता येथे नव्यानेच दादाजींचे ' योगानंद चंदन पादुका ' व ' ध्यान मंदिर ' उभे राहिले आहे. ऐतिहासिक व संत भूमीचा वारसा असलेल्या नगर जिल्ह्याच्या दृष्टीने हा अलौकिक ठेवा आहे.

दादाजींना वायु वेगाने सातत्याने मार्गदर्शन करणारे तेजस्वी सद्गुरु प.पू.आनंद स्वामीजी यांचे आजही हिमाचल प्रदेशातील कुलू खोऱ्यातील गुहेत वास्तव्य आहे. त्यांचे आजचे अंदाजे वयोमान १६५ वर्ष असावे. या महान योग्याचे दत्त सांप्रदायी साधकांना दिव्य दर्शन व्हावे, अशी दादाजींची अखेरच्या श्वासापर्यंत तळमळ,आंतरिक इच्छा होती. वंदनीय दादाजी साधक समूहाचे ' सुरक्षा कवच ' होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या