लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई : एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांच्या बंडानंतर
तसेच काही निवडक खासदारांच्या आग्रहानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यानी एनडीएच्या
राष्ट्रपतीपदाच्या उमेद्वार द्रौपदी मुर्मू याना पाठिंबा देण्याचा मोठा निर्णय घेतल्याचे वृत्त हाती आले आहे . पक्षातील काही सहकाऱ्यांच्या हट्टानंतर राष्ट्रपतीपदाच्या
निवडणुकीत उद्धव ठाकरे एनडीएला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
एकनाथ शिंदे यांच्या गटाला १० ते १२ खासदारांचा पाठिंबा असल्याचं वृत्त वरचेवर येत
आहे. तसा दावाही एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर
उद्धव ठाकरे यांनी काल सेना खासदारांची बैठक बोलावली होती. २२ खासदारांपैकी केवळ
१० खासदार 'मातोश्री'ला पोहोचले. तीन
तास उद्धव ठाकरे खासदारांची 'मन की बात' ऐकली. त्यानंतर त्यानी आज एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने
राजकीय चित्र पालट्ले आहे.
येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची
निवडणूक होत आहे. यूपीएकडून यशवंत सिन्हा तर एनडीएतर्फे द्रौपदी मुर्मू
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याच निवडणुकीत भाजपच्या द्रौपदी
मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी सेनेमधील
काही खासदारांची मागणी होती. खासदार राहुल शेवाळे यांनी तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
यांना तसं पत्र लिहिलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पक्षातील पडझडीला
सावरण्यासाठी उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे मोठ्या ताकदीने मैदानात उतरले आहेत.
आता खासदारांचं म्हणणं ऐकून घेऊन, त्यावर मंथन
करुन उद्धव ठाकरे यानी एक पाऊल मागे घेत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे.
0 टिप्पण्या