लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पंढरपूर- दि.१० जुलै २०२२
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पांडुरंगाची महापूजा केली. कोरोनामुळे गेले दोन वर्षापासून
आषाढी- कार्तिकीस ओसाड असलेले चंद्रभागेचे वाळ्वंट यंदा चांगलेच फुलले. आषाढी एकादशीनिमित्त
यावर्षी पंढरपूरमध्ये १० लाखावर भाविकांचा मेळा जमला नव्हता. कोरोनाचा प्रादुर्भाव
कमी असल्यामुळे पंढरपूरला दिड्या मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. विठूरायाच्या नामघोषाने
पंढरपूर दणाणून गेले. भाविकही विठूरायाची जयघोष करीत तल्लीन झालेले आहेत.
यंदा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावच्या वारकरी दाम्पत्याला
आषाढी एकादशीच्या पांडुरंगाच्या महापूजेचा मान मिळाला. मुख्यमंत्र्याच्या हस्ते
शासकीय पूजा झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शनाला मंदिर खुले ठेवण्यात आले. दिवसभर
दर्शनासाठी भाविकांच्या रांगा.लागल्या होत्या.
बीड जिल्ह्याला मान मिळाल्याने भाविकांमधून या दाम्पत्याचे अभिनंदन केले जात आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. दरम्यान राज्यात नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. त्या विनंतीली निवडणूक आयोगाने मात्र तीन अटींसह हि परवानगी दिली होती.
पूर्वनियोजित शासकीय
कार्यक्रमांमध्ये कोणत्याही निधी विकास योजना, कार्यक्रमांची
घोषणा करू नये. सर्व कार्यक्रमांसाठी आवश्यक त्या नियमानुसार परवानग्या घेण्यात
याव्यात. कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यास हरकत नाही, पण त्या
ठिकाणीही उपरोक्त अटींचे पालन करण्यात यावे, असं निवडणूक
आयोगाने म्हटलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या पहिल्याच सार्वजनीक
दौर्यास आचार संहितेचा फटका बसला.
0 टिप्पण्या