Ticker

6/Breaking/ticker-posts

शिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; आघाडीला धक्का ; विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी !

 
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदासाठी आज मतदान पार पडलं असून या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचा विजय झाला आहे. नार्वेकर यांना या निवडणुकीत शिंदे गट, भाजप आणि अपक्ष असे एकूण १६४ मते मिळाली, तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात असलेल्या राजन साळवी यांना १०७ इतकी मते मिळाली. तसंच रईस शेख, अबू आझमी आणि शाह फारुख अन्वर हे आमदार तटस्थ राहिले. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती. अखेर या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे.


विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर शीरगणतीद्वारे विधानसभा अध्यक्षपदासाठी मतमोजणी सुरू झाली. मात्र ही मतमोजणी सुरू असतानाच १४ क्रमांकाच्या मतापर्यंत मोजणी जाताच गोंधळ उडाला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी या प्रक्रियेवर आक्षेप घेत काही सूचना केल्या


विधिमंडळात उडाला चांगलाच गोंधळ

शीरगणीतीद्वारे सत्ताधारी आमदार १, , ३ याप्रमाणे मत देत होते. पण यात काही आमदारांनी त्यांचा आसन क्रमांकच सांगितला. यामुळे विधिमंडळात चांगलाच गोंधळ उडाला. या गोंधळावर जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला आणि आसन क्रमांकाप्रमाणेच मतमोजणी करण्याची विनंती केली. याला भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनुमोदन दिलं आणि त्यानुसार शिरगणतीला सुरुवात करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या