Ticker

6/Breaking/ticker-posts

Big Breaking ; शिवसेना फुटीच्या उंबरठयावर ; ‘नॉट रिचेबल’ मंत्री शिंदे मीडियाशी काय बोलणार?

 आज १२ वाजता मुख्यमंत्री ठाकरे यांनी बोलावली आमदारांचीबैठक







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

दि. 21 मे  2022 :   राज्यसभे पाठोपाठ  विधान परिषद निवडणुकीत ही  अलिप्त  असलेले  शिवसेना  नेते  एकनाथ  शिंदे 13 आमदारांना घेऊन गायब  झाल्याने  सेनेच्या गोटात खळबळ उडाली असून  शिवसेनेत उभी  फुट  पडल्याचे  वृत्त  हाती आले  आहे. दरम्यान ना. शिंदे हे १२ वाजता मीडियाशी बोलणार असून ते काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष  लागले आहे

 

दरम्यान  काल  सोमवारी  विधान परिषदेसाठी मतदान होऊन  पुरेसे  संख्याबळ नसतानाही भाजपाने  पाचही  जागा मोठ्या मताधिक्याने जिंकल्या.  हा  महाविकास आघाडीला  मोठा  धक्का मानला जात आहे.  आघाडीचे  अनेक  आमदार फुट्ल्याची  माहिती  समोर येत आहे. त्यात एकट्या शिवसेनेचे २० आमदारानी भाजपाला साथ दिल्याची माहिती बाहेर आली आहे.  त्यामुळे आघाडीत सगळे काही आलबेल नाहीहे  स्पष्ट  आहे. 

 

या  निवडणुकीत  सेनेचे  सचिन  अहीर    पडवी हे  विजयी  झाले, परंतु  विजयानंतर  अहिर  वगळता  एकही नेता  मीडिया समोर आला नाही.  त्यानंतर  सेनेचे काही आमदार गायब असल्याची  माहिती मिळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी मध्यरात्री वर्षा बंगल्यावर बैठक घेतली. या वेळी मुंबईसह  जवळपासचे आमदार हजर होते.  शिवसेनेतील या घडामोडींची माहीती मिळताच  राष्ट्रवादीचे नेते  जयंत पाटील आणी खा.  सुप्रिया  सुळे यांनी  वर्षा वर  मुख्यमंत्री  ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. ना.  शिंदे आणी ईतर  आमदारांना रात्री उशिरापर्यंत संपर्क करण्याचा प्रयत्न केला.  परंतु हे सर्व नॉट रिचेबल होते. 

 

दरम्यान  या  राजकीय  घडामोडीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज 12 वाजता  सेनेच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली असून यावेळी शिंदे व  त्यांच्या बरोबरचे आमदार उपस्थीत राहतात का? याची उत्सुकता आहे.  तसेच या बैठकीत काय निर्णय होतोयाकडे  लक्ष  लागले आहे. तर दुसरीकडे मंत्री एक्नाथ शिंदे हे सुद्धा १२ वाजताच प्रेस घेउन मीडियाशी संवाद साधणार असल्याचे अपडेट आहे. या संपूर्ण वेगवान घडामोडींकडे राज्याचे लक्ष  लागले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या