Ticker

6/Breaking/ticker-posts

जागतिक महिला दिनानिमित्त हनुमान नगर येथे आरोग्य शिबिर संपन्न

  






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


खरवंडी कासार :हनुमाननगर (भारजवाडी)  प्राथमिक शाळेत  अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा करण्यात आला. हनुमाननगर वस्तीवरील महिला तसेच सर्व माता पालकांचे मोफत आरोग्य व रक्त तपासणी शिबीर महिला दिनानिमित्त शाळेमध्ये आयोजित करण्यात आले होते 

   प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वृषाली दराडे व डॉ. मोनिका आघाव यांच्या नेतृत्वाखाली या शिबिराचे आयोजन केले होते यावेळी  प्राथमिक आरोग्य केंद्र खरवंडी कासारचा संपूर्ण वैद्यकीय स्टाफ हनुमाननगर शाळेमध्ये हजर होता.

        शाळेतील मुलींनी भाषणाद्वारे महिला दिनाचे महत्त्व व महिला सबलीकरणाचे विषय हाताळले. महिलांचे आरोग्य त्यांचे समाजातील स्थान, आई म्हणून त्यांच्या भूमिका, लेकरांच्या शिक्षणासाठी असलेली जबाबदारी, मासिक पाळी, शारीरिक स्वच्छता अशा विविध विषयावर  डॉ वृषाली  दराडे  यांनी महिलांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. महिलांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या व त्यांना वैद्यकीय सल्ला त्यांनी दिला. संपूर्ण आयुष्य काबाडकष्ट करून शेतामध्ये राबलेल्या आजीबाई पासून शाळेचा माजी विद्यार्थिनी पर्यंत सर्वांनी आरोग्य अधिकारी  सोबत मनमोकळेपणाने चर्चा केली. डॉक्टरीणबाई आम्हाला भेटायला थेट साळात आली अशी चर्चा ८० ओलांडलेल्या आजीबाई करत होत्या.   तीस वर्षापुढील सर्व महिलांचा रक्तदाब तपासण्यात आला. तर सर्वच महिलांच्या रक्ताची तपासणी केली. त्यांच्या आरोग्य विषयक समस्या डॉक्टरांनी जाणून घेतल्या. सुमारे ४५ महिलांच्या रक्ताची तपासणी या शिबिरांमध्ये करण्यात आली.

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भरजवाडी गावच्या  सरपंच सौ.आशाबाई माणिक बटुळे या होत्या. वयोवृद्ध महिला, माता भगिनी, माजी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. खऱ्या अर्थाने आगळ्यावेगळ्या पद्धतीने जागतिक महिला दिन आज साजरा करण्यात आला. दोन्ही वैद्यकीय अधिकारी यांनी आरोग्य तपासणी शिबिरानंतर शाळेची पाहणी केली. शाळेतील विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. भविष्यात सर्व माता भगिनींचे व विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर आपण या ठिकाणी आयोजित करू असे आश्वाशीत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुख्याध्यापक लहु बोराटे यांनी केले .

 सदुढ महीलेला शाळेच्या वतीने साडी भेट 

 या शिबीरामध्ये    रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण  सर्वाधिक जास्त  असेले   महिला भगिनीला स्वतःच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेत असल्यामुळे बक्षीस म्हणून शाळेच्या वतीने साडी सप्रेम भेट देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या