लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
खरवंडी कासार: गावातील तरुणानी एकत्र येत गावातिल देवालयाचा व शिक्षण मंदीराचा कायापालाट केला आहे युवकानी जर मनावर घेतले तर कोणतेही काम सहजा सहजी होते याचा प्रत्यय खरवंडी कासार येथे येत
हल्लीच्या तरुणाई मोबाईल नेटवर्किंंगच्या माध्यमातुन नको असलेले स्विकारत भरकटत चालली आहे . भौतिकता मनाला अशांत करत आहे मात्र खरवंडी कासार येथिल युवकांनी संघटन करत गावात विविध उप्रकम राबवत गाव विकासासाठी प्रयत्न करत आहेत गावातिल प्राथमिक शाळेत मुलभुत सुविधा प्राप्त करून देण्याबरोबरच गावातिल देवालयाचा ही जिणोद्धार करत आहेत हनुमान मंदीर,शनी मंदिराचा जिर्णोंधार बरोबरच आता गणेश मंदीराचे ही जिणोद्धाराचे काम हाती घेतले आहे . गावातुन व परिसरातुन समाज्यातिल दानशुर मदत करत या युवका ना प्रोत्साहन देत आहे.
गावातील नवतरूणानी एकत्र येऊन गावातील हनुमानाचे मंदीराचा जिर्णोद्धार करून प्रशस्त असे हनुमान मंदिर करूण दाखवले त्याच प्रमाणे गावातील शनी मंदीराच्या चौथरा देखील सुंदर केला गावातिल शिक्षण मंदीर डिजिटल व्होण्यासाठी ही पुढाकार घेतला या तरुणानी आता गावातील गणेश मंदीराच्या समोरील सभा मंडप बाधंकम करायचे ठरवले व त्यासाठी गावातील गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन त्या साठी एक नामी शकल लढवून एक लकी ड्राॅचे आयोजन केले लकी डॉ मधील काही भेट वस्तु दानशुरा कडुन देणगी स्वरूपात जमा केल्या तसेच लकी डॉ च्या सोडतीला आलेल्या मान्यवरा नी युवकाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मान्य करत मंदीराच्या जिणोद्धारासाठी स्वखुषीने देणगी ही दिली .
या लकी डॉ सोडती मध्ये प्रथम बक्षीस ई स्कूटर हे होते आलेल्या मान्यवरांच्या हस्ते लकी ड्रायव्हर चे पहीले कुपन विशेष म्हणजे १००१ क्रमांका चे निघाले भाग्यवान विजेता ओमकार दारूणकर रा. चापडगाव ता. शेवगाव येथील रहिवासी असून आज येथे बोलावून घेऊन त्याचा सत्कार करूण त्यास ई स्कूटर प्रदान करण्यात आली यावेळी भाग्यवान विजेता त्याने गणेश मंदीर जिर्णोद्धार साठी एकविस हजार रूपये देणगी दिली.
या कर्यक्रमासाठी सर्व गणेश मंडळातील तरूण एकत्र येऊन छान नियोजन बध्द कार्यक्रम केला गावातील नागरीकांनी तरूणांना कौतुकाची थाप दिली.
0 टिप्पण्या