Ticker

6/Breaking/ticker-posts

खळबळजनक: विहिरीत आढळले आईसह तीन मुलांचे मृतदेह ; घातपाताचा संशय ?

 


मयतामध्ये आई  दोन मुली आणि चार महिन्याचा मुलगा

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


संगमनेर :  संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव जवळ असणाऱ्या कोठे बु  गावातील खांडगेदरा येथे आई व तीन मुलांचे मृतदेह विहिरीत आढळून आले आहेत. मयतामध्ये आईसह दोन मुली आणि एक चार वर्षाच्या चुमुकल्याचा समावेश आहे . त्यामुळे जिल्ह्य़ात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसां कडून मिळालेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगावजवळ कोठे बु गावातील खांडगेदरा येथे स्वाती बाळासाहेब ढोकरे आपल्या चार आणि तीन वर्षाच्या मुली आणि चार महिन्याचा  मुलांसह राहत होती. परंतु शुक्रवारी दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास त्या चौघांचा मृत देह अचानकपणे विहीरीत आढळून आला.   या घटनेची माहिती मिळताच  अनेकांनी ढोकरे यांच्या निवासस्थानी  धाव  घेतली. 

या महिलेनेआपल्या मुलांसह नेमकी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली  की कोणी  हत्याकांड केले.  या lषयी पठार भागात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. या घटनेची माहिती मिळताच घारगावचे पो नी सुनील पाटील हे आपल्या सह कार्यांसहे   खांडगेदरा भागातील घटना स्थळी पोहचले. 

 त्यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आणि विहिरीतून त्या आईचे व तीन मुलांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी संगमनेर येथे ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान  या  घटनेचा  सखोल  तपास  होण्याची गरज असल्याची  जमलेल्या  ग्रामस्थांची मागणी आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या