Ticker

6/Breaking/ticker-posts

नगरसेविका रुपालीताई वारे यांच्या निधीतून मुकुंदनगर ड्रेनेज लाईन

 

मुकुंदनगर शांतीधाम येथे लोकसहभागातून मंदिराचा जीर्णोद्धार करू - आ.संग्राम जगताप







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


अहमदनगर :- मुकुंदनगर शांतीधाम मंदिर परिसरामध्ये विविध प्रश्न प्रलंबित आहेत हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत गेल्या पंधरा दिवसापूर्वी या परिसराची पाहणी केल्यानंतर आज प्रत्यक्षात नगरसेविका रूपाली वारे यांच्या प्रयत्नातून ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ झाला आहे .एक-एक प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावले जातील ४० वर्षा पूर्वीचे मुकुंदनगर शांतीधाम मंदिराचा जीर्णोद्धार मंदिर सेवा समितीच्या पुढाकारातून सुरू करू या भागातील सर्व नागरिक गुण्यागोविंदाने व एकोप्याने राहत आहेत सर्वजण एकत्रित येऊन या मंदिराच्या कामाला सुरवात करू काही राजकीय लोक आपली राजकिय पोळी भाजण्यासाठी  जाती-जातीमध्ये तेड निर्माण करतात आता हे दिवस संपले आहेत नागरिक सुजान व सुसंस्कृत झाले आहेत मंदिर परिसराचे सुशोभीकरणाचे काम लवकरच हाती घेऊ असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.


मुकुंदनगर शांतीधाम मंदिर परिसरामध्ये नगरसेविका रुपाली वारे यांच्या प्रयत्नातून ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ परिसरातील नागरिक हिरामण भोकरे व आशा भोकरे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी आ.संग्राम जगताप,मा. नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक समद खान, नगरसेवक बाबा खान,मा. नगरसेविका नसीम शेख,सचिन शिंगारे, योगेश ठुबे, संजय डुकरे, सागर पाडळे, दशरथ घाटविसावे, महादेव कराळे,वाहब सय्यद,स्वामी म्हस्के,अनिल निर्मळ, गणेश गवते,बंटी तागड,गोरख करांडे, सचिन गाडे,अकिल सय्यद, फारुक शेख,रिजवान सय्यद, जावेद खान आदी उपस्थित होते.


माजी नगरसेवक निखिल वारे म्हणाले की, गेल्या पंधरा दिवसापूर्वी मुकुंदनगर शांतीधाम या परिसराची आमदार संग्राम जगताप यांच्यासमवेत आम्ही पाहणी केली होती यावेळी या परिसरातील नागरिकांचे प्रश्न समजावून घेऊन दिलेला आश्वासन पूर्तीसाठी प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आले लवकरच या ठिकाणी असलेल्या मंदिराचा जिर्णोद्धार करू असे ते म्हणाले.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या