Ticker

6/Breaking/ticker-posts

आमचे नेते शिवाजीराव कर्डिलेच ; शेंडी सोसायटी संचालकांचा खुलासा

 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क


नगर :  नगर तालुक्यातील शेंडी गावची विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्थेची निवडणूक शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी ग्रामविकास आघाडी पॅनलने लढविली असून १३ पैकी १२ संचालकांनी विजयी संपादित केला. नगर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संचालकांना फोन करून बोलून घेतले व आमची इच्छा नसतानाही आमचा सत्कार करून फोटो काढला परंतु आम्ही सर्व ग्रामस्थ व संचालक मंडळ शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली शेंडीगावमध्ये काम करत असून इथून पुढेही फक्तच त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे.

 

आज आमचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेला सत्कार गैरसमजुतीतून झाला आहे अशी माहिती शेतकरी ग्रामविकासाच्या सर्व विजयी उमेदवारांनी निवेदनाद्वारे जाहीर केली असून आम्ही शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखालीच काम करत असल्याची माहिती संचालक मंडळाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे.

 

निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सत्कार केला यावेळी दशरथ भगत, गोरख कराळे,संतोष शिंदे, सुदाम कराळे, पोपट दाणी,साहेबराव चव्हाण, अर्जुन कराळे,बाबासाहेब तेलोरे, धोंडीराम भगत, साहेबराव कजबे,राजू देठे, जनाबाई पडोळे, यावेळी ग्रामस्थ बाबुराव पडोळे, हरिभाऊ कराळे,बाळासाहेब भगत, राधाकृष्ण कराळे, सुनील शिंदे,अविनाश शिंदे, सुनील देठे, रमेश देठे, रेवननाथ कराळे,गोट्या भगत,सुभाष कराळे,वसंत शिंदे, दत्तात्रय देठे, दादू देठे, चांगदेव भगत, मारुती कराळे, रावसाहेब कराळे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या