Ticker

6/Breaking/ticker-posts

ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात गणेश जयंती उत्साहात साजरी




लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

  नगर:  नगर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेश मंदिरात श्री गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होतेगेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या गणेश यागाची आज सांगता झालीतसेच सकाळी अभिषेकमहापुजा करुन दुपारी गणेश जन्मावेळी उद्योजक विजयकुमार बोरुडे परिवाराच्या हस्ते आरती करण्यात आलीयावेळीभाविकांनी पुष्पवृष्टी करुन गणेश जन्मोत्सव साजरा केला.  पुजारी संगमनाथ महाराज यांनी विधीवत पुजा केली.

 गणेश यागचे यजमानपद उद्योजक विजयकुमार बोरुडे यांनी स्वीकारले होतेपौरोहित्य नाशिक येथील मुकुंद शास्त्री मुळे यांनी केलेभाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होतीगणेश जयंतीनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

 जन्मोत्सवप्रसंगी जिल्हा कारागृह अधिक्षक शामकांत शेडगेमाजी महापौर सुरेखा कदमदेवस्थानचे अध्यक्ष ॅड.अभय आगरकरउपाध्यक्ष पंडितराव खरपुडेसचिव अशोकराव कानडेविश्वस्त विजय कोथिंबीरेपांडूरंग नन्नवरेहरिश्चंद्र गिरमेभाऊसाहेब फुलसौंदरचंद्रकांत फुलारीबापूसाहेब एकाडेज्ञानेश्वर रासकररंगनाथ फुलसौंदरगजानन ससाणे आदि उपस्थित होते.देवस्थानच्यावतीने मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली असूनभाविकांच्या सावलीसाठी मंडप टाकण्यात आला असून भव्य  आकर्षक प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या