Ticker

6/Breaking/ticker-posts

पद्मश्री पुरस्कार माझा नव्हे तर ग्रामस्थांच्या कार्याचा गौरव - पद्मश्री पोपटराव पवार

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


पारनेर : राजकारण व समाजकारण यांच्या समन्वयातूनच खऱ्या अर्थाने गावाचा, राज्याचा व देशाचा विकास होऊ शकतो. मला मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा माझ्या कामाचा नव्हे तर हिवरे बाजारच्या ग्रामस्थांनी केलेल्या श्रमदानाचा व केलेल्या कामाचा गौरव आहे मी फक्त निमित्तमात्र आहे, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले आहे.

शिरापूर येथे जि. प. कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती मधुकर उचाळे मित्र मंडळ व शिरापूर ग्रामस्थांच्या वतीने आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांचा पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला त्या वेळी पवार बोलत होते. माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले, आमदार अरूण जगताप, जिल्हा परीषदेच्या सदस्या राणीताई लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, कन्हैया दूध उद्योग समूहाचे मच्छींद्र लंके, माजी सभापती सुदाम पवार, राहुल शिंदे, दिपक पवार, शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते, पारनेर तालुका पत्रकार संघाचे मार्गदर्शक दत्ता उनवणे, योगेश रोकडे, संतोष काटे, सरपंच हनुमंत भोसले, बाळासाहेब पुंडे, सुखदेव पवार, पोपट माळी, ज्ञानेश्वर वरखडे, युवा नेते रुपेश ढवणविलास रोहिले, अस्मिताताई उचाळे, अजिंक्य उचाळे व ऋतुजा उचाळे, सुधामती कवाद आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवाजीराव कर्डीले म्हणाले, आज पोपट पवारांना पद्मश्री म्हणणं सोप असलं तरी त्यामागील त्यांनी अनंत अडथळ्यांना पार करत घेतलेले कष्ट, समाजासाठी दिलेलं योगदान खूप मोठ आहे. जलसंधारणासारखे विविध प्रश्न सोडविण्याचं काम त्यांनी केल असून त्यामुळेच त्यांचे व हिवरेबाजारचे नाव देशपातळीवर झळकले आहे.  या वेळी जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके, पोपट माळी, संतोष काटे, सुदाम पवार, राहुल शिंदे , प्रशांत गायकवाड, बाबाजी तरटे यांची भाषणे झाली सूत्र संचालन माजी सरपंच भास्कर उचाळे यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या